Parth Pawar News: राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आज शिंदे गटाचे राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. पार्थ पवार यांनी अचानक शंभुराज देसाई यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क यांना उधाण आले आहे.
पार्थ पवार आणि देसाई यांच्या भेटीवर भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी सूचक विधान केलं आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. त्यामुळेच त्यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेतली असावी, असं गोपिचंद पडळकर यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले आहेत गोपीचंद पडळकर?
पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार आमदार झाले. बारामती अॅग्रोही त्यांच्याकडे आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही रोहित पवार झाले. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल असं पडळकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून
हक्काच्या मतदारसंघामध्ये अडीच लाखाहून अधिक मतांनी पराभूत झालाचे शल्य त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांनी भेट घेतली असावी, असं गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत. पार्थ पवार यांनाही राजकारणात स्थिर व्हायचं असेल. पण भेट का घेतली? काय चर्चा झाली हे मला माहीत नाही, अशी सारवासारवही त्यांनी त्यांच्या व्यक्तव्यानंतर केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अधिवेशनादरम्यान नागपुरात गेल्याने चर्चेला उधाण आलं होतं.
दरम्यान आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार घेतली आहे. या भेटीनंतर भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.