Supriya Sule & Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: सुप्रिया सुळेंचं ते वक्तव्य! १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट; पहिला शरद पवारांची निवृत्ती अन् दुसरा?

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील आता येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला. शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरला. त्यानंतर मला या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी 2 ते 3 दिवस द्या असं शरद पवार म्हणालेत. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांनी 15 दिवसांपूर्वी केलेल्या त्या व्यक्तव्याची चर्चा रंगली.

अलीकडेच काही दिवसांपूर्वी अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. त्याआधी त्यांनी भाकरी फिरवणारे विधान केले होतं. त्यांतर राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीत काहीतरी मोठे घडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत होते. त्याचवेळी त्यांच्या सुप्रिया सुळे यांनीही येत्या 15 दिवसांत दोन राजकीय स्फोट होतील, असं वक्तव्य केलं होतं.

तर एक स्फोट महाराष्ट्रात आणि दुसरा दिल्लीत. अशा स्थितीत शरद पवारांनी पहिला गौप्यस्फोट केला की काय, असा अंदाज आता राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आता दुसरा राजकीय धमाका काय होऊ शकतो हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

पहिला राजकीय स्फोट महाराष्ट्रातून झाला आहे. आता दुसरा राजकीय स्फोट काय असू शकतो? दुसरा राजकीय धडाका दिल्लीतून येईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. शिवसेनेच्या या १६ बंडखोर आमदारांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT