NCP MLA rohit Pawar tweet on PM Modi meet tesla ceo elon musk during in US visit  
महाराष्ट्र बातम्या

PM Modi In US : 'टेस्ला'सोबत बोलणी करताना महाराष्ट्रच डोळ्यासमोर ठेवा! PM मोदींना राष्ट्रवादी नेत्याचं आवाहन

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमीत्त वेगवेगळ्या उद्योगपतींची भेट पंतप्रधान घेणार आहेत. यादमम्यान टेस्ला या जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक कार कंपनीटे सीईओ इलॉन मस्क यांची भेट झाली. या भेटीनंतर टेस्ला कार लवकरच भारतात येईल असे मस्क यांनी म्हटलं आहे. यादरम्यान टेस्ला सोबत बोलणी करताना महाराष्ट्रच डोळ्यासमोर ठेवून बोलणी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन मस्क यांच्यासोबत झालेल्या भेटीचा फोटो ट्वीट केला आहे. या ट्वीटचा स्क्रिनशॉट देखील यावेळी रोहित पवारांनी शेअर केला आहे. त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये रोहित पवारांनी टेस्ला सोबत बोलणी करताना महाराष्ट्रच डोळ्यासमोर ठेवून बोलणी करावी अशी मागणी केली आहे.

"पतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं हे ट्वीट पाहून खूप आनंद झाला.. राज्यात बेरोजगारी वाढली असताना गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प अन्य राज्यात आणि तेही प्रामुख्याने गुजरातमध्ये गेले आहेत.. त्यामुळं इथल्या युवांचा हक्काचा रोजगार हिरावला गेला... त्यांचं हे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी टेस्लाच्या प्रकल्पावर स्वाभाविकपणे महाराष्ट्राचाच हक्क आहे... शिवाय येथील पायाभूत सुविधांचा विचार करता टेस्ला सोबत बोलणी करताना महाराष्ट्रच डोळ्यासमोर ठेवून बोलणी करावी" असे रोहित पवार म्हणाले आहेत.

"कोणत्याही पंतप्रधानांना परदेशात मिळणारा मान-सन्मान हा त्यांच्या देशातील नागरिकांमुळे मिळत असतो आणि स्वाभाविकच त्यात महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रावर सातत्याने झालेला अन्याय दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपण प्रयत्न करावेत, ही राज्याचा एक नागरिक म्हणून आपणास नम्र विनंती!" असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

तसंच या पकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे आग्रह धरावा अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे.

मस्क यांची टेस्लाबद्दल मोठी घोषणा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर इलॉन मस्क यांनी टेस्लाबद्दल मोठी घोषणा केली. मी पुढच्या वर्षी भारताचा दौरा करण्याचा विचार करत आहे, तसेच टेस्ला लवकरच भारतात येईल ही माझी खात्री असल्याचेही मस्क यांनी सांगितले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि माझी सकारात्मक आणि चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT