NCP Esakal
महाराष्ट्र बातम्या

Supreme Court:एकाच वर्षात दोनदा अपात्र आणि पुन्हा खासदारकी बहाल, मोहम्मद फैजल यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Mohammed Faisal MP:शरद पवार गटासाठी 'खुशखबर'! राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, खासदारकी पुन्हा बहाल

Manoj Bhalerao

Mohammed Faisal NCP:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही दिवसांपुर्वी मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आलं होतं. मात्र, शरद पवार गटाच्या या नेत्याला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून त्यांना सुप्रीम कोर्टाकडून खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे.

२००९साली केरळ उच्च न्यायालयाने मोहम्मद फैजल यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांना या आरोपाखाली १० वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. ज्यामुळे लोकसभेने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी दाद मागितली.ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना खासदारकी पुन्हा बहाल केली.

या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याविरोधात दोन वेळा अपात्रतेची कारवाई कऱण्यात आली आणि पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली. शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यातील पक्ष चिन्हाचा वाद निवडणुक आयोगासमोर होता. यावर सुनावणी सुरु असतानाच फैजल यांची खासदारकी रद्द कऱण्यात आली होती.

कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने जानेवारी महिन्यात मोहम्मद फैजल आणि इतर तिघांवर पी. सालीहच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ट्रायल कोर्टाने सर्व आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरण वाढली; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, बँक निफ्टी 1000 अंकांनी कोसळला

IND vs NZ 2nd Test : Washington Sunder चा आणखी एक पराक्रम; मागील १६ वर्षांत अश्विन वगळता कोणालाच जमला नव्हता असा विक्रम

Mudra Loan: मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट; आता मिळणार 20 लाखांच कर्ज

MVA Seat Sharing Formula : मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तिसऱ्यांदा बदलणार! थोरात म्हणाले, अजून बेरीज...

Hardik Pandya मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? आयपीएल रिटेंशनआधी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT