Supriya Sule Esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ; आकडा ऐकला तर...

2009 ते 2019 या काळात सलग खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीमध्ये सरासरी 286 टक्क्यांची वाढ

सकाळ डिजिटल टीम

सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या 71 लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत 286 टक्क्यांनी वाढ झाली आहे, याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स यांच्या 1-1 खासदाराचा समावेश आहे. तर सर्वात जास्त महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. या अहवालानुसार सुप्रिया सुळे यांचं नाव दोन नंबरवर आहे.

ADR

एडीआरच्या रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती 51.53 कोटी रुपये इतकी होती. 2019 मध्ये 173 टक्क्यांनी वाढून 140.88 कोटी रुपये इतकी झाली. दहा वर्षात सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 89.35 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, AIUDF चे खासदार बदरूद्दीन अजमल यांच्या संपत्तीमध्ये 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 30 कोटी रुपये होती तर 2019 मध्ये त्यांची संपत्ती 78 कोटी रुपये इतकी झाली.

तर 2009 ते 2019 या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीमध्ये सरासरी 286 टक्के वाढ झाली आहे. भाजप खासदार रमेश चंदप्पा जिगाजिनागी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स Association for Democratic Reforms (एडीआर)रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

या रिपोर्ट्सनुसार, ज्या दहा खासदारांची संपत्ती सर्वाधिक वाढली त्यामध्ये भाजपच्या सहा खासदारांचा समावेश आहे. तर शिरोमणी अकाली दल, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजू जनता दल आणि AIUDF च्या एका खासराचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT