ncp party tutari symbol sakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Party Tutari Symbol : राष्ट्रवादीला ‘तुतारी’चा बंदोबस्त करावाच लागेल; नऊ मतदारसंघात घेतली ४ लाख १४ हजार मते

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सर्वाधिक चांगला स्ट्राईकरेट राहिला आहे. या पक्षाने दहा जागा लढल्या, त्यापैकी ८ जागा जिंकल्या आहेत.

प्रमोद बोडके,

सोलापूर - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सर्वाधिक चांगला स्ट्राईकरेट राहिला आहे. या पक्षाने दहा जागा लढल्या, त्यापैकी ८ जागा जिंकल्या आहेत. दोन पैकी साताऱ्याची जागा जागण्यात मतदारांमध्ये चिन्हाचा घोळ झाल्याचे आता समोर येऊ लागले आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेच्या निवडणुकीत तापदायक ठरलेल्या तुतारीचा लवकरच बंदोबस्त करावा लागणार आहे. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी जागा जाण्याची शक्यता अधिक असते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कमी दिवसात तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाची किमया सर्वांनी पाहिली आहे. कमी दिवसात कमालीचे लोकप्रिय झालेले हे चिन्ह मानले जात आहे.

याच संधीचा फायदा घेऊन विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांकडून तुतारी चिन्हासाठी आग्रह होण्याची शक्यता अधिक आहे. तुतारी चिन्ह गोठविण्यासाठी राष्ट्रवादीला कायदेशीररित्या निवडणूक आयोगाकडे प्रयत्न करावे लागण्याची शक्यता आहे.

पवारांच्या तुतारीच्या मतदारसंघातील स्थिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दहा जागा लढविण्यात आल्या. त्यापैकी रावेर आणि सातारा या ठिकाणचे उमेदवार पराभूत झाले. वर्धा वगळता नऊ मतरसंघात तुतारी आणि तुतारी वाजविणारा माणूस असे दोन चिन्ह होते. या दोन चिन्हांमुळे मतदारांमध्ये संभ्रम दिसला.

चौदा मतदारसंघात तुतारी फेल

राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत नव्हता, अशा १४ मतदारसंघात तुतारीचा प्रभाव एकदम किरकोळ दिसला आहे. परभणीमध्ये कृष्णा पवार यांनी तुतारी चिन्हावर सर्वाधिक १० हजार १५४ मते घेतली आहेत. उर्वरित १३ ठिकाणी तुतारीचे उमेदवार पाच हजार मतांच्या आत राहिले आहेत.

नाशिकमधून सुधीर देशमुख यांना ३१६७, कल्याणमधून अमरीशराज मोराजकर यांना २६२०, ठाण्यातून राजीव भोसले यांना ८८६, उस्मानाबादमधून योगीराज तांबे यांना १३३६, लातूरमधून ॲड. प्रदीप चिंचोलीकर यांना ५३३, सोलापुरातून परमेश्‍वर गेजगे यांना ३१४६, यवतमाळमधून प्रा. किसान अंबुरे यांना १७२०, हिंगोलीतून सत्तार पठाण यांना २४६३, जालन्यातून अजहर सय्यद यांना १५४६, औरंगाबादमधून भरत कदम यांना १४९५, मावळमधून मारुती कांबळे यांना ४८२९, पुण्यातून संदीप चोरमले यांना १६४५ तर शिर्डीतून सतीश पवार यांना २७७१ मते तुतारी चिन्हावर मिळाली आहेत. ज्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार नाही, त्या ठिकाणी तुतारी का फेल गेली, याचे कोडे अनेकांना पडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT