मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला. पण या निकालावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन आता अनेक राजकीय प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी नार्वेकरांवर टीका करताना त्यांनी भाजपच्या बड्या नेत्याचं ऐकून हा निकाल दिला असा आरोप केला आहे. (ncp rohit pawar on rahul narvekar result about shivsena mla disqualification)
भाजपच्या बड्या नेत्याच्या म्हणण्यानुसार निकाल
रोहित पवार म्हणाले, लोकशाहीच्या मंदिराची गरिमा राखण्याची संधी अध्यक्षांना मिळाली होती. पण तसं झालं नाही. पण ही त्यांची चुकी आहे असं मी म्हणणार नाही. कारण भाजपत जे लोक असतात ते स्वतःचा मेंदू, विचार कधीही वापरत नाहीत. त्यांना नेत्याचंच ऐकावं लागतं. काल दुर्देवानं अध्यक्षांना भाजपच्या मोठ्या नेत्याचं ऐकावं लागलं आणि संविधानाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्यांना निकाल द्यावा लागला. (Latest Marathi News)
पण आता संविधान हे भाजपच्या काळात राहिलं की नाही अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटायला लागली आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.