Rohit Pawar On Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : विधानसभेला कर्जत-जामखेडमधून अजित पवार रिंगणात उतरणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा

रोहित कणसे

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. सर्व पक्षांचे नेते राज्यभरात सभा, दौरे करत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघात अजित पवार रिंगणात उतरू शकतात असा अंदाज देखील व्यक्त केला आहे. त्यामुळे या आगामी विधानसभा निवडणुकीत देखील पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, माझ्या मतदारसंघात महायुतीकडून मोठी ताकत लावण्यात येत आहे. अनेक उमेदवार माझ्या विरोधात उभे राहू शकतात. काही सर्वेक्षणात माझ्या विरोधात अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला उभे करता येईल याची चाचपणी सुरू आहे. भाजपचा एखादा मोठा नेताही माझ्या विरोधात उभा राहू शकतो. मात्र माझ्या मतदारसंघातील जनता निष्ठेला महत्त्व देईल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहिला हा विश्वास असल्याचेही रोहित पवार म्हणाले. तसेच बारामतीत कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय शरद पवार घेतील असेही रोहित पवार म्हणाले.

कंत्राटी भरतीच्या नावाखाली अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आलाय. खाजगी कंपन्यांना कामगार भरतीसाठी सहा हजार दोनशे कोटींचा खर्च करण्यात आला. त्यातुन अडीच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलाय असा आरोप रोहित पवार यांनी यावेळी बोलताना केला.

म्हणून हसन मुश्रीफ यांनी पवारांची साथ सोडली

ब्रीक्स, क्रीस्टल, एस ओ टु आणि बी व्ही जी या कंपन्यांना ही कंत्राटे देण्यात आली. क्रीस्टल कंपनी प्रसाद लाड आणि ब्रीक्स कंपनी हसन मुश्रीफ यांची आहे. हसन मुश्रीफ यांच्या ब्रीक्स इंडीया कंपनीला बाराशे कोटी रुपयांची कंत्राटे दिली. याचसाठी हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडली असेही रोहित पवार म्हणाले.

महिला विकास विभागाच्या कामासाठी साडेचार हजार कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात आली आहेत. किरीट सोमय्या यांनी याच ब्रीक्स इंडीया कंपनीवर आरोप केले होते. या खाजगी कंपन्यांना कंत्राटे दिल्यानं युवकांची संधी नाकारण्यात आली.

लाडकी बहीण योजनेला विरोध नाही

लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही, मात्र ही योजना व्यवस्थित राबवावी. व्याप्ती वाढवावी. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही याची व्यप्ती वाढवू. लाडकी बहिण योजनेसाठी पैसे आहेत पण इतर योजनांसाठी पैसे नाहीत. लोकसभेला महायुतीने प्रत्येक मतदारसंघात साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च केलेत. विधानसभा निवडणुकीत देखील असाच खर्च करण्याचा प्रयत्न आहे. पण हा गरीबांचा पैसा आहे असेही रोहित पवार म्हणाले.

वेगवेगळ्या विविध विकास कामांसाठी जी पस्तीस हजार कोटी रुपयांची टेंडर काढण्यात येतील. त्यातुन दहा टक्के रक्कम म्हणजे साडेतीन हजार कोटी रुपयांचा मलीदा खाण्याचा प्रयत्न आहे. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी गुजरातच्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं. १५ ऑगस्टला देखील हे गणवेश मुलांना मिळालेले नाहीत असेही रोहित पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तरुणाने केला जीव देण्याचा प्रयत्न; वर्षा बंगल्याच्या परिसरात नेमकं काय घडलं?

Rohit Pawar : हसन मुश्रीफ महायुतीच्या नेत्यांसोबत का गेले? रोहित पवारांनी गंभीर आरोप करत सांगितले 'हे' कारण

Free Fire Max Codes : आले रे आले फ्री फायरचे रिडीम कोड आले; हिरे, गन स्किन्स अन् बरंच काही,लगेच मिळवा फ्री रिवॉर्ड्स

Latest Marathi News Updates : 10 तारखेनंतर आचारसंहितेची शक्यता, गुरूवारी मंत्रिमंडळाची बैठक

"तर मला पोलीस पकडून नेतील" राखीने पंतप्रधान मोदींना केली जामीन मिळवून देण्याची विनंती, "आईच्या अस्थि विसर्जनासाठी..."

SCROLL FOR NEXT