sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतनंतर आता पवार गृहमंत्री वळसे-पाटलांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यात सिल्वर ओकवर (silver oak) झालेल्या भेटीचे नेमके कारण काय? यावर चर्चा सुरू असतानाच, राऊत (Sanjay Raut) यांच्याशी आज सकाळी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse Patil) भेटीसाठी रवाना झाले. विशेष म्हणजे पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीवेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) हजर असणार आहे. दरम्यान शरद पवार यांनी या भेटीसाठी पोलिस आयुक्त नगराळे यांनाही निमंत्रण दिलं आहे. या तिघांच्याही भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नेमकी कोणत्या विषयावर होणार चर्चा?

तिघांच्या भेटीवरून राजकीय हालचालींना वेग

आज (ता.९) सकाळी संजय राऊत शरद पवार यांची भेट घेण्यास सिल्वर ओकवर दाखल झाले होते. सपत्निक त्यांनी पवारांची भेट घेतली. जवळपास तासभर झालेल्या भेटीनंतर राऊत सिल्वर ओकवरुन निघाले. त्यानंतर पवारही वळसे पाटलांच्या भेटीसाठी रवाना झाले. शरद पवारांनी वळसे पाटलांच्या भेटीवेळी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनाही निमंत्रण दिलं आहे. या भेटीत खूप महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

'या' विषयांवर चर्चा होणार

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या क्रुझ ड्रग्ज केस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटक प्रकरण या गोष्टी चर्चेत आहेत. समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक यांचा सामना दररोज सुरु आहे. पत्रकार परिषदांच्या सिलसिल्याच्या माध्यमातून दररोज आरोप प्रत्यारोपांची राळ उडतीय. याच सगळ्या अनुषंगाने पवार-वळसे पाटील- मुंबई पोलीस आयुक्त यांच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

-या भेटीत मुंबईतील ड्रग्ज प्रकरण, हायव्होल्टेज आर्यन खान ड्रग्ज केस, अनिल देशमुख अटक प्रकरण या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती कळतीय. गेल्या दोन तासात मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

-आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी दररोज नवनवे खुलासे, दावे समोर येत आहेत. त्यात मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात कलगीतुरा सुरु आहे. मलिक दररोज नवनवे दावे करुन पुरावे सादर करतायत. मुंबई पोलिसांनीही वानखेडे यांना समन्स पाठवलं आहे. या सगळ्या अनुषंगाने पवार गृहमंत्र्यांची चर्चा करणार असल्याचे समजते.

- दुसरीकडे ईडीच्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवतीचं संशय आणकी बळावला आहे. कारण मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही, असं चांदिवाल आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

-महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप परमबीर सिंग यांनी केले होते. गेले अनेक दिवस ते फरार होते. पण 1 तारखेला ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. 13 तास मॅरेथ़ॉन चौकशी झाली आणि नंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. पण त्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आहे.

-चांदीवाल आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करत माझ्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. आता माझं कोणतंही म्हणणं नाही, असं प्रतिज्ञापत्रात परमबीर सिंह यांनी नमूद केलं. म्हणजेच आरोप करणारे परमबीर सिंग यांनीच पुरावे नसल्याचं म्हटल्याने देशमुखांना मोठा दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT