NCP Sharad Pawar Sabha At yeola nashik Update Chhagan Bhujbal NCP Crisis political news  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : वसंतदादा आठवून देणाऱ्या भुजबळांना पवार देणार प्रत्युत्तर? राष्ट्रवादीतील बंडानंतर आज पहिलीच सभा

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात सातत्याने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असून अजित पवार विरूद्ध शरद पवार असा थेट सामना महाराष्ट्राला पाहायला मिळत आहे.

पक्षात गट पडल्यानंतर शरद पवारांनी आपण न्यायालयीन लढाई लढणार नाहीत तर आपण जनतेच्या न्यायालायत जाणार असं जाहीर केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार त्यांनी वेक्त केला. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहे.

शरद पवारांची या दौऱ्यातली पहिलीच जाहीर सभा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ला असलेल्या येवल्यात शनिवारी (ता. ८) होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांची ही पहिलीच जाहीर सभा असून दुपारी ४ वाजता येवला बाजार समितीच्या पटांगणात ती होणार आहे. त्यामुळे शरद पवार या सभेत ते काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

वर्मावर बोट ठेवणाऱ्या भुजबळांना उत्तर देणार?

अजित पवार गटाच्या मुंबईतील एमईटी इंस्टीट्यूट येथील पहिल्याच सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी भुजबळांनी वसंतदादा पाटील, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देत वर्मावर बोट ठेवलं होतं. यानंतर आता शरद पवार याबद्दल काही भाष्य करणार का हे पाहावे लागेल.

भुजबळ काय म्हणाले होते?

साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या अशी विनंती भुजबळांनी शरद पवारांना केली होती.

तसेच आजही माझ्या मनात शरद पवार यांच्याबद्दल प्रेम आहे. पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांना देखील असचं वाईट वाटलं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो. तेव्हा त्यांच्यासोबत ओबीसीच्या मुद्द्यावर मतभेद झाले, तेव्हा ३६ लोक तुमच्यासोबत आले. मला सुद्धा येणं भाग पडलं. तुम्ही तिथं थांबा म्हणून सांगितलं नाहीत. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब यांनाही असंच वाईट वाटलं. धनंजय मुंडेंना घेतलंत तेव्हा काका असलेले गोपिनाथ मुंडे आणि बहिण पंकजा यांच्या डोळ्यात देखील अश्रू आले होते. या सगळ्याची पुनरावृत्ती व्हायला लागली आहे, असे छगन भुजबळ म्हणाले होते.

शरद पवार यांनी या बंडाचे आव्हान परतून लावण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्याची सुरुवात पवारांनी बंडखोर व कधीकाळी विश्वासू छगन भुजबळ यांच्या मतदार संघातून होणार आहे. छगन भुजबळांसह बडखोरांचा ते कसा समाचार घेतात, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT