Yashwantrao Chavhan Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

ND Mahanor : "यशवंतरावांच्या निधनानंतर 'असे' शरद पवार मी कधीच पाहिले नव्हते" महानोरांच्या पुस्तकातून उजाळा

दत्ता लवांडे

जेष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय आणि साहित्यिक वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांचे अनेक साहित्य आणि कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. चित्रपटांसाठीही त्यांनी लिहिलेले गाणे प्रसिद्ध आहेत.

आमदार झाल्यानंतर १९७८ सालापासून शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत त्यांचा चांगला संबंध आला. शरद पवार आणि मी, यशवंतराव चव्हाण आणि मी अशी त्यांची दोन पुस्तके त्यांच्यासोबतच्या आठवणी जाग्या करून देतात.

यशवंतराव चव्हाण यांच्या निधनावेळी महानोर हे शरद पवार यांच्यासोबत होते. त्याच दिवशी एस. एम. जोशी यांचा ८१ वा वाढदिवस होता. कार्यक्रमाला सुरूवात झाली असतानाच यशवंतराव चव्हाणांच्या निधनाची बातमी आली अन् सगळेच गहिवरले... समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ना. धों. महानोर यांच्या "शरद पवार आणि मी" या पुस्तकामध्ये त्यांनी या घटनेला उजाळा दिला आहे.

"शरद पवार त्या दिवशी खूप रडले होते, कारण...

एस. एम. जोशी यांनी वयाची एक्क्याऐंशी वर्षं पूर्ण केली त्यानिमित्ताने २५ नोव्हेंबर ८४ला पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. देशभरातले समाजवादी, काँग्रेस, कम्युनिस्ट, रिपब्लिकन अशा अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते या सोबतच हजारो एस.एम.प्रेमी त्या गौरवासाठी पुण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक नेत्यांच्या, समाजसेवी कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या. समारंभासाठी यशवंतराव चव्हाण येणार होते, म्हणून सगळेच वाट पाहत होते.

शरदराव व मी गाडीने पुण्याच्या रेस्ट हाऊसला पोहोचलो. पाठोपाठ दिल्लीहून फोन आला. यशवंतरावांचं दिल्लीत निधन झालं होतं. ते वृत्त ऐकून आम्हा दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळलं. महाराष्ट्रभरातून फोनवर फोन यायला सुरूवात झाली. शरदराव भरल्या आवाजाने सतत फोन घेत होते. शरदरावांचा-माझा इतक्या वर्षांचा सहवास, पण ते इतके हळवे झालेले, गलबलून गेलेले त्याआधी मी कधीच पाहिले नव्हते. माझीही अवस्था त्यापेक्षा वेगळी नव्हती. राजीव गांधी, आणखी दिल्लीतल्या नेत्यांचे, महाराष्ट्रातल्या यशवंतरावांच्या जिव्हाळ्यातल्या मंडळींचे, कुटुंबियांचे फोन येत होते- ‘अंत्यविधी कुठे करायचा? मुंबई की कर्‍हाड?’

त्यात पुन्हा एस.एम. यांच्या गौरवासाठी आलेल्या बड्या नेत्यांची, यशवंतरावप्रेमींची रेस्ट हाऊसला गर्दी झाली. रेस्टहाऊसचा परिसर, बाहेरचे रस्ते तुडुंब भरलेले. सगळेच शोकाकुल. दुसर्‍या दिवशी यशवंतराव चव्हाण कर्‍हाडमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार होते. पण आता सगळंच संपलं होतं. सगळाच हलकल्लोळ माजला होता. शरदराव मध्येच बाथरूमला गेले. ते बराच वेळ बाहेर आले नाहीत. मी ओळखलं, आत रडून मोकळं होत असावेत. त्यांनी बाहेर येऊन पुन्हा फोन घेतले. फोनवर एखादं वाक्य बोलायचे. त्यांनी राजीव गांधींना कळवलं, अंत्यविधी मुंबईतच करू. किर्लोस्करांच्या हेलिकॉप्टरने मी आणि शरदराव मुंबईत पोहोचलो. शरदराव पूर्णवेळ गप्पच होते. आम्ही मुंबईत पोहोचेस्तोवर विमानतळावर भेटणार्‍यांची प्रचंड गर्दी जमली होती.

वातावरण शोकाकुल होतं. यशवंतरावांच्या निधनानंतर वर्षभरात शरदरावांनी ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ आकारास आणलं. मुंबईत मंत्रालयासमोर त्याची इमारत उभी राहिली. यशवंतरावांच्या विचारांचं प्रतिबिंब त्यात असावं, महाराष्ट्रातल्या, देशातल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर तोडगे काढण्यासाठी प्रतिष्ठानातर्फे प्रयत्न व्हावेत, अशी त्याच्या रचनेमागची संकल्पना होती. पक्ष व जातीधर्मांना तिथे थारा नसेल, सार्वजनिक जीवनातील सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांना समान स्थान असेल, असं त्याचं स्वरूप होतं. प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीवर स्वत: शरदराव पवार, वसंतराव दादा पाटील, एस. एम. जोशी, लक्ष्मणशास्त्री जोशी, नीळकंठ कल्याणी, राम प्रधान, अण्णासाहेब शिंदे, दादासाहेब रूपवते, प्रा. पी. व्ही. पाटील, लक्ष्मण माने यांसारखे नेते होते."

अशा शब्दांत त्यांनी "शरद पवार आणि मी" या पुस्तकातून यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांसोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians ची धाव पुन्हा तीन वेळा IPL ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कोचकडे, फ्रँचायझीने केली घोषणा

Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा एकजण अल्पवयीन? आरोपीने कोर्टासमोर दिली माहिती

Mumbai Indians संघात द्रविडच्या खास माणसाला मिळणार 'जॉब'? पण मग मलिंगा...

Kareena & Karisma Kapoor : करिनाने केली करिश्माची पोलखोल ; 'हा' अभिनेता आहे लोलोचा क्रश

Who is Anuj Thapan: ज्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी Bishnoi Gang नं बाबा सिद्दिकींना मारलं, तो Anuj Thapan नेमका आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT