आजच्या धकाधकीच्या व स्पर्धात्मक जीवनात भौतिक सुखांच्या मागे धावत असलेला माणूस आपल्या माणसांशी असलेले रक्ताचे मैत्रीचे नातेसंबंध विसरत चालला आहे. तसेच, आजच्या डिजिटल युगात मोबाईल व इंटरनेटच्या कृत्रिम जगात वावरत असताना माणसाकडून माणुसकी लोप पावत चालली आहे.
आज माणूस आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना रस्त्यावर व वृद्धाश्रमात सोडून जात आहे. काहीजण आई- वडिलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा येत नाहीत. येथे जिवंत हाडा-मांसाच्या व्यक्तीची ही अवस्था तर, मुक्या जीवांचे काय हाल होत असतील, याचा विचार न केलेला बरा...
पण, समाजात योगेश तुपे यांसारख्या व्यक्ती आहेत, ज्यांनी स्वतःला मुक्या प्राणीमात्रांच्या सेवेसाठी आहोरात्र वाहून घेतले आहे. पुण्यातील पाषाण परिसरात राहणारे योगेश तुपे (वय ३२) दहा वर्षांपूर्वी पाषाण परिसरात प्राणी व सर्पमित्र म्हणून काम करायचे. सापांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नेवून सोडायचे.
विविध ठिकाणी अडकलेल्या पक्षांची सुटका करून, पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्यावर उपचार करायचे. हे काम करत असताना त्यांना रस्त्यावर मोकाट, अनाथ व अपघातग्रस्त गायी- बैल दिसायचे. मोकाट व अनाथ गायींचे शहरी भागात होणारे हाल त्यांना पाहवत नव्हते.
आपल्या कृषी प्रधान देशात शेती व पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याचे सामर्थ्य भारतीय देशी गोवंशात आहे. शिवाय गाय ही भारतीय अर्थव्यवस्थेची व राष्ट्रीय एकात्मतेचेचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा मोकाट व अनाथ गाय व इतर गुरांना सांभाळण्याचा त्यांनी निश्चिय केला आणि 'जगदंब गोसंवर्धन, ट्रस्ट' या संस्थेची स्थापना केली.
भाकड आणि वयस्क गायी, बैलांच्या संगोपनासाठी पुढाकार घेऊन, संस्थेकडून अपघात तसेच इतर कारणांमुळे जखमी झालेल्या गुरांवर उपचार केले जातात. संस्थेत कत्तलीपासून रक्षण केलेल्या, आजारी असलेल्या, अपघातांमध्ये जखमी झालेल्या व अपंगत्व आलेल्या गायी असून, अशा सर्व प्रकारच्या गायी व गुरांवर संस्थेत उपचार केले जातात. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून जे शेतकरी गायी सांभाळू शकत नाहीत, त्या गायी विकत अथवा 'गोदान' अंतर्गत सांभाळण्यासाठी घेतल्या जातात.
या सर्व गुरांचे पालनपोषण, रक्षण व निगा राखणे अशी सर्व कामे संस्थेमार्फत केली जातात. आजमितीस संस्थेच्या पाषाण येथील जागेत ३२ गुरांचा सांभाळ केला जात आहे. यामध्ये ७ बैल व २५ गायी आहेत. यातील ६ गुरे ही अपघातात जखमी होऊन अपंगत्व आलेली आहेत. संस्थेमार्फत आतापर्यंत एक हजारहून अधिक बेवारस गायी, बैल आणि इतर प्राण्यांवर योग्य उपचार करून विविध ठिकाणच्या 'गोसंवर्धन' संस्थांमध्ये त्यांना दाखल केले आहे.
बेवारस गायीला मिळाले जीवनदान :-
ऐन दिवाळीत मार्केटयार्ड भागातील बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या गायीला 'जगदंब गोसंवर्धन, ट्रस्ट'च्या वतीने संस्थेत दाखल केले होते. दोन दिवसांनी कळाले की, गाय नीट खात-पीत नसून, तिच्या नाका- तोंडातून घाण बाहेर पडत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तपासणी केल्यानंतर कळाले की, गायीच्या पोटात खूप प्लास्टिक व कचरा असल्याने गायीचे पोट फुगले आहे.
त्यानंतर गायीवर शस्त्रक्रिया करून तब्बल ५५ किलो प्लास्टिक पिशव्या बाहेर काढण्यात आल्या. यासोबतच २५० ग्रॅम लोखंडाचा चुरा, पैशांचे कॉईन्स व बॅटरीचे सेल काढण्यात आले. त्यानंतर गायीवर व्यवस्थित उपचार करण्यात आले आणि वसुबारसच्या दिवशी गायीला जीवदान मिळाले.
कोणत्याही अनुदानाशिवाय स्वखर्चातून सेवा :-
योगेश तुपे स्वतःचे स्नॅक (वडापाव) सेंटर चालवून ३२ गुरांचा सांभाळ करत आहेत. त्यांचे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. प्रत्येक गुराला दिवसाला साधारण पंधरा किलो चारा लागतो आणि ३२ गुरांच्या चाऱ्याचा दिवसाचा खर्च एक हजार दोनशे रुपये असून, महिन्याचा खर्च ३६ हजार आहे. याशिवाय प्रत्येक गुराच्या वार्षिक आरोग्य तपासणी व लसीकरणाचा साधारण दोन हजार रुपये खर्च आहे.
योगेश तुपे गुरांवर होणारा खर्च भागविण्यासाठी विविध स्तरातून मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. ३२ गुरांच्या संगोपनासाठी योगेश तुपे यांना समाजातून सामूहिक मदतीची गरज आहे. एक हजार दोनशे रुपये देणगी देऊन आपण आपण ३२ गुरांच्या एका दिवसाच्या चाऱ्यासाठी मदत करू शकता. मुक्या प्राण्याना जगविण्याचा कार्यात आर्थिक मदतीच्या स्वरूपात आपण खारीचा वाटा उचलू शकता.
अशी करा मदत
'सोशल फॉर अॅक्शन' या क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर 'जगदंब गोसंवर्धन, ट्रस्ट' संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी - भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन, संस्थेच्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.
किंवा खालील बँक खात्यात ऑनलाईन देणगी पाठवू शकता. ऑनलाईन देणगी बँक खात्यात ट्रान्सफर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअँप नंबर वर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
Name :- Sakal Social Foundation
Bank Account No :- 459104000021252
Name of Bank:- IDBI bank , Laxmi Road ,Pune.
IFSC Code :- IBKL0000459
१९ स्वयंसेवी संस्थांचे अभियान पूर्ण :-
'सकाळ सोशल फाउंडेशन' च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी 'सोशल फॉर अॅक्शन' हा क्राउड फंडिंगसाठी ऑनलाईन, डिजिटल वेबसाईट स्वरूपात प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. या माध्यमातून दानशूर व्यक्ती, संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) स्वीकारणाऱ्या आस्थापनांना एकत्र आणून शालेय विद्यार्थी, शाळा व ग्रामीण भागातील नागरिकांशी निगडित असलेल्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
तसेच, महाराष्ट्रात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे अभियान राबविण्यात येते. या अभियानामार्फत अडीच वर्षात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १९ स्वयंसेवी संस्थांचे अभियान पूर्ण केले आहे. तसेच, क्राउड फंडींग द्वारे जमा झालेला निधी त्या-त्या संस्थांना वर्ग केला आहे.
टीम SFA
support@socialforaction.com
अधिक माहितीसाठी संपर्क – ८६०५०१७३६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.