सोलापूर : राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कनेक्शन आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा, अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी आणि खासगी कंपन्यांसाठी ‘महावितरण’ने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही संबंधितांना मिळणार आहे. ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात बिलिंगआणि माहिती तंत्रज्ञान या विभागांनी संयुक्तपणे ही ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे.
राज्यात पोलिस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या खासगी कंपन्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यामध्ये त्यांच्या विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्याची वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिले भरली नाहीत, अशी समस्या समोर आली. त्यामुळे त्यांना दंड आणि व्याज द्यावे लागते. कधी कधी बिल भरले नसल्याने कनेक्शनही तोडले जाते.
आता ‘महावितरण’च्या नव्या सुविधेमुळे एकदा ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनीला त्यांच्या मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शनसाठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत याची माहिती मिळेल. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक बिल वेळेत भरल्यास एक टक्का सवलतही मिळेल. याखेरीज कागदी बिलाऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक बिलामागे दहा रुपयांची सवलत आणि डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमाल ५०० रुपयांची सवलतही मिळणार आहे. या सुविधेसाठी ‘महावितरण’च्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा नजिकच्या ‘महावितरण’ कार्यालयातही याची माहिती मिळेल.
कार्यालयांचा वीजेचा खर्च एकत्रितपणे समजेल
‘महावितरण’ने सरकारी विभाग आणि खासगी कंपन्यांना उपलब्ध केलेल्या या सुविधेमुळे ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या संकल्पनेला बळ मिळणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनी, या सुविधेचा लाभ घेऊ शकते. यामुळे त्यांना आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होईल, त्यांच्या अंतर्गत विविध कार्यालयात होणारा विजेचा वापर आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची माहिती सहजपणे एकत्रित उपलब्ध होईल आणि बिलाबाबत काही तक्रार असल्यास त्याही ऑनलाईन करता येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.