मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात चांदीवाल आयोगासमोर हजर झाल्यावर गुप्त बैठक झाली होती. दोघेही तासभर गप्पा मारत असल्याचे समोर आले होते. यावेळी काही पोलिस देखील हजर होते. त्यांनाच आता नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी (New Mumbai Police Commissioner) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वाझे आणि परमबीर सिंह यांच्यामध्ये झालेल्या बैठकीवेळी हजर असलेले चार पोलिस कर्मचारी दोषी आढळले आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी अशा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावत शिस्तभंगाची कारवाई का करू नये? याचं लेखी उत्तर मागितलं आहे.
नेमकं काय झालं होतं? -
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ सहायक उपनिरीक्षक सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगाच्या शेजारी ज्या खोलीत त्यांची कथित गुप्त बैठक घेतली त्या खोलीत एका उपनिरीक्षकासह चार पोलीस उपस्थित होते. मात्र, ते इंग्रजीत बोलत असल्यानं दोघांमधील संभाषणातील एकही शब्द समजला नाही, असा दावा पोलिसांनी केला होता. दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याचे कळताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीसंबंधी चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना दिले होते. हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली, असं वळसे पाटील म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.