chandrashekhar bawankule sharad pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : नवीन पक्ष आला की पवारांना भीती - चंद्रशेखर बावनकुळे

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी गोष्ट तयार करत आहेत. राजकारणात कोणीही नवं आलं की ‘बी टीम’ म्हणता. आमचेच लोक त्यांच्या पक्षात गेलेत. ती भाजपची ‘बी टीम’ नाही, बीआरएसशी आमचे देणेघेणे नाही. पण, राज्यात नवीन पक्ष आला की त्याची शरद पवार आणि काँग्रेसला भीती वाटते, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आयोजित टिफीन बैठकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बावनकुळे म्हणाले, ‘२०२४ नंतर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करून आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपदी बसवायचे, असे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना याची कुणकूण लागल्याने शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येत नव्हते तर दुसरीकडे अजित पवार मंत्रालयात बसून राष्ट्रवादीची कामे करत होते. पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीने १०० आमदार निवडून येण्याचे ध्येय ठेवले होते.’

एक परिवार म्हटल्यानंतर त्यांच्यात वाद होतात, पण हे वाद दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सक्षम आहेत. एखाद्या जाहिरातीमुळे भाजप-शिवसेना युती तुटणार नाही. ही युती फेविकॉलने जोडलेली आहे. श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेला वादही मिटला आहे. एखाद्या दुसऱ्या जाहिरातीने युतीमध्ये दरी पडणार नाही. काँग्रेसला मत देणे किती धोकादायक आहे, हे कर्नाटकातील निर्णयावरून दिसून येत आहे. सावरकर धडा काढून टाकला, धर्मांतर कायदा रद्द केला, आता गोहत्या बंदी कायदाही रद्द करणार आहेत, हे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

जयंत पाटील आमच्या बैठकीला होते का?

शिवसेनेचे आमदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. त्यावर ‘भाजपचा काय प्लॅन आहे, हे जयंत पाटलांना कसे माहिती?, ते आमच्या गोपनीय बैठकीला उपस्थित होते का?’ असा टोला बावनकुळे यांनी लगावत, ‘शिवसेनेचे आमदार शिवसेनेच्या तिकिटावर लढतील; पण त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आमची पूर्ण ताकद लावू,’ असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT