MPSC Typing Skill Test : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ‘लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक’ या टंकलेखन आवश्यक असलेल्या पदांच्या परीक्षांसाठी नवी कार्यपद्धती जाहीर झाली आहे. (New Procedure of MPSC for Typing Skill Test news)
त्यानुसार लिपिक-टंकलेखक पद भरतीत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार आहे. तसेच कर सहाय्यक पदासाठी दोन्ही भाषांतील टंकलेखन कौशल्य चाचण्या द्याव्या लागणार आहेत. दोन्ही पदांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी अहर्ताकारी स्वरूपाची केली आहे. ‘एमपीएससी’ने या संदर्भात माहितीपत्रक काढले आहे.
लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक या पदांच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी आणि अन्य बाबींचा साकल्याने विचार करून कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक पदासाठीच्या पदभरतीत संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेच्या आधारे संबंधित पदांसाठी भरल्या जाणाऱ्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवले जातील. ही कार्यपद्धती यापुढे होणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीला लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अपंग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी आणि दोन संधी लागू असल्याने या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.