सरकारनं संभाजीराजेंनाही मॅनेज केल्याचं दिसतंय, असा खळबळजनक आरोप मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलाय.
Maratha Reservation : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी आशा अनेकांना आहे. गेली काही वर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या 1,064 मराठा तरुणांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले होते.
दरम्यान, अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासाठीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) चकार शब्दही काढण्यात आला नाही. बैठकीला उपस्थित असणाऱ्या संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठा समन्वयकांना तसं बजावलं होतं. त्यामुळं सरकारनं संभाजीराजे छत्रपती यांनाही मॅनेज केल्याचं दिसतंय, असा खळबळजनक आरोप मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलाय. यानंतर उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय. यावर प्रतिक्रिया देत माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही संभाजीराजेंवर टीका केलीय.
औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कोण नेतृत्व करणार असेल तर त्यांना सगळ्यांना घेऊन भूमिका मांडणं गरजेचं आहे. ठराविक लोकांना घेऊन काम होणार नाही तर बिघडेल, छत्रपतींच्या गादीचा आदर आहे; पण मी ठरवली तीच दिशा हे योग्य नाही, असं ट्विट आज निलेश राणेंनी केलं आहे. राणेंच्या ट्विटचा रोख संभाजीराजे छत्रपतींवर असल्याचं दिसून येत आहे. औरंगाबाद इथं मराठा क्रांती मोर्चानं छत्रपती संभाजीराजे आमचं नेतृत्व करु शकत नाही. आम्ही फक्त गादीचा सन्मान करतो. आमचे मार्गदर्शक फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं पत्रकार परिषदेत जाहीर केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.