राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या सीटवर आहेत.
सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ही निवडणुक अपक्ष लढवण्याचे ठरवले आहे. आमचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीही अडचण नाही. आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत संभाजीराजे यांना देऊ, असे म्हणत पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, शरद पवार यांनी आता आपल्या भूमिकेवरून घुमजाव केले आहे. त्यामुळे भाजपाचे निलेश राणे यांनी ट्विट करत पवारांना टोला लगावला आहे.
राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यानंतर उरलेली अतिरिक्त मते ही आम्ही शिवसेनेलाच देऊ, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर ट्विटवरून निशाणा साधला. हे होणारच होतं. शरद पवार आणि शब्द पाळला हे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते शरद पवार कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या सीटवर आहेत. ज्यांनी मराठा मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली होती, विसरू नका.. असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. आमचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीही अडचण नाही. आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत संभाजीराजे यांना देऊ, असे शरद पवार म्हणाले होते. एकतर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा किंवा आम्ही आमचा उमेदवार रिंगणार उतरवू, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे आता यावर राजकीय वर्तळातून कोणत्या प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागणार आहे. याशिवया आता संभाजीराजे छत्रपती यांची यानंतर कोणती भूमिक घेणार यावरही चर्चा रंगल्या आहेत.
चार दिवपांपूर्वी निलेश राणे यांनी संभाजी राजेंना एक सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली. लगेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलं आहे. उरलेली मतं राजघराण्याला? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.