नांदेड : गेल्या वर्षी ता. तीन जून रोजी मुंबई व महाराष्ट्राच्या पश्चिमी (Maharashtra) किनारपट्टीवर निसर्ग चक्रिवादळाने धडक (strom ) मारली होती. आता या वर्षी सुमारे पंधरा ते सतरा दिवस आधीच तौकटे चक्रिवादळ केरळ किनारपट्टीवर धडक मारण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १२ मे) रोजी दुपारी दोन वाजता इन्सॅट या उपग्रहानी (Insat satelight) पाठवलेल्या छायाचित्रानुसार जवळपास संपूर्ण अरबी समुद्रावर चक्रिय कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे व याचा केंद्र हे केरळच्या पश्चिम समुद्रात आहे. (‘Nisarg’ will be followed by ‘Toukte’ - Prof. Srinivasa Aundhkar)
गुरुवार (ता. १३ ) मे पासून याचे चक्रवातात रुपांतर होण्यास सुरुवात होईल व अंदाजे १५ मे रोजी याचे तौकटे चक्रिवादळात रुपांतर होईल. व केरळच्या पश्चिम किनारपट्टीवर सर्व प्रथम धडकेल. यावेळी त्याचा वेग ताशी पन्नास किमीच्या जवळ असेल. सध्या असलेली त्याची व्याप्ती, दाब, वेग व दिशा पहाता हे चक्रिवादळ लगेच शमेल असे दिसत नाही. ता. १६ मे पर्यंत संपूर्ण केरळ, लक्षद्विप व मालदीव बेटांच्या किनारपट्टीवर बरसल्यावर त्याची दिशा उत्तर दिशेला कोकण किनारपट्टी कडे सरकेल. येथून पुढील ७२ तासात म्हणजे ता. १८ मे पर्यंत कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र या राज्यांच्या पश्चिमी कोकण किनारपट्टीवरुन मुंबई कडे सरकण्याची शक्यता आहे. ता. १९ मे पासून याचा मुंबईकडे आल्यावर व मुंबईवर बरसल्यावर याचा मार्ग पश्चिम दिशेला सरकत गुजरात ला वळसा घालून ता. २२ मे रोजी पाकिस्तानच्या दक्षिण किनारपट्टीवर कराचीला धडकणार आहे. एकुणच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अरबी समुद्रात वेळेच्या आधी चक्रिवादळाने हजेरी लावली आहे.
हेही वाचा - सावधान! गावात गर्दी कराल तर सरपंचपद येईल धोक्यात!
या निर्माण होत असलेल्या चक्रिवादळाचे तौकटे असे नामकरण असणार आहे. तौकटे म्हणजे Gecko (छोटी पाल ) . हे नाव म्यानमार या देशाने सुचवलेले आहे.
.एनसीईपीच्या दाव्यानुसार मे २१ ते ऑगस्ट २१ या कालावधीत न्युट्रल परिस्थिती स्थीर असेल व त्यानंतर पुढील चार पाच महिने ला-निनाकडे तापमान सरकणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी तापमान सरासरी तापमानापेक्षा घसरणार आहे. अशीच काही परिस्थिती सीपीसी व आयआरआय या अंतरराष्ट्रिय संस्थांनी ही वर्तवलेली आहे.
सध्या प्रशांत गेल्या महिन्यात महासागरातील विषुववृत्ताच्या ३. ४ परिसरातील तापमान हे ला- निना म्हणजेच सरासरी तापमाना कडून न्युट्रल परिस्थिती कडे सरकत आहे (-०.४). याचवेळी भारतीय सामुद्रिक स्थिरांक (आय ओ डी ) हा धन (+) होत आहे. या मुळे ह्या भारतीय उपखंडात यंदा पावसाचे प्रमाण सरासरी व त्यापेक्षा जास्त असणार आहे. तसेच येत्या काही महिन्यात ला निना परिस्थिती निर्माण झाली तर लांबलेला पावसाळा यंदाही अनुभवयास मिळेल असे दिसते आहे.
लेखक- Shrinivas Aundhkar
Director, MGM's APJ Abdul Kalam Asrtrospace Science Centre, Aurangabad.(MS) India +91 9422171256
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.