Narayan Rane-Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

Sindhudurg Bank Election: नारायण राणेंनी राजकीय विषयावर बोलणं टाळलं

केरळच्या धर्तीवर होणार कोकणात उद्योग ; नारायण राणे

तुषार सावंत

कणकवली : नारायण राणे (Narayan Rane) यांनी राजकीय विषयावर बोलणे टाळले. कणकवली जिल्हा बँक निवडणूक (Sindhudurg District Central Co operative Bank Election) मतदान बाबत किंवा नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन बाबत बोलणे टाळून जिल्ह्यात बोर्डामार्फत उद्योग येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान बँकेच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली असून, उद्या सकाळी नऊ वाजता ओरस (Oras) येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कणकवली मतदान केंद्रावर बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर सौ सावंत यांनी पोलिस ठाण्यात सतीश सावंत यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. कणकवलीत मतदानाची वेळ संपल्यानंतर शिवसेनेकडून फटाक्याची आतिशबाजी झाल्यावर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्याच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात कणकवली वगळता शांततेत मतदान झाले. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपशी जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची झाली आहे त्यामुळे निकालाची प्रतीक्षा आहे. दोन्हीकडून सर्वच्या सर्व जागा जगण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र तणावाची परिस्थिती लक्षात घेता या जिल्ह्यात कॉयर बोर्डाचे उद्योग येतील असे नारायण राणे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने कॉयर बोर्डसाठी मोठ्या प्रमाणात निधी ठेवलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता उद्योग मोठ्या प्रमाणात उभारला जाईल त्या अनुषंगाने अधिकारी वर्गाची बैठक आज घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. दिल्ली येथील नीलम कंट्री साईड येथे आज दुपारी तीन वाजल्यापासून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला कॉयर बोर्डाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले, कोकणात काथा उद्योगासाठी पोषक वातावरण आहे त्या अनुषंगाने आम्ही नियोजन करत असून, येत्या काळात कॉयर बोर्डाच्या माध्यमातून येथील बेरोजगारांना प्रशिक्षण दिले जाईल. या रोजगारासाठी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी केंद्र सरकारने ठेवली आहे. त्यामुळे इथल्या बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याचा उद्देश आहे. केरळच्या धर्तीवर या जिल्ह्यातही वाढवण्या बाबत धाडसाने पाऊल केंद्र सरकार टाकत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT