उस्मानाबाद : एमआएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी आम्हाला सोबत घ्या, असा प्रस्ताव महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून एकमेकांवर टीका केली जात आहे. यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जीभ घसरली असून त्यांनी तुळजापूर मंदिराच्या आवारातच अश्लील विधान केलं आहे.
एमआयएमकडून महाविकास आघाडीला आघाडीचा प्रस्ताव (AIMIM Offer To Mahavikas Aghadi) आला असून त्यावर आपली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न नितेश राणेंना विचारण्यात आला. ''एमआयएमने महाविकास आघाडीतील तीन पक्षांना लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी लग्न आणि हनीमून करावा की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या घरातील हा विषय आहे'', असं नितेश राणे यावेळी म्हणाले. त्यानंतर त्यांनी अतिशय अश्लील विधान केलं. याबाबत 'साम टीव्ही'नं वृत्त दिलं आहे.
एमआयएमचा नेमका प्रस्ताव काय? -
महाविकास आघाडीचं तीन चाकांचं सरकार आहे. त्याला आमचं एक चाक जोडून चारचाकी बनवा आणि आम्हाला सोबत घ्या, असा प्रस्ताव एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राजेश टोपेंसोबत झालेल्या बैठकीत दिला होता. तसेच तुमच्या वरिष्ठांना आमचा निरोप पोहोचवा, असंही त्यांनी टोपेंना सांगितलं होतं. आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप वारंवार केला जातो. पण, हा आरोप नेहमीसाठी संपुष्टात आणायचा असेल तर आमच्यासोबत आघाडी करा, असं जलील म्हणाले होते. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेना असल्यानं सर्वांचं लक्ष सरकारच्या भूमिकेकडं लागलं होतं. याबाबत संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी आघाडीची शक्यता नाकारली. औरंगजेबापुढं झुकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका संजय राऊतांनी जाहिर केली.
दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजपकडून देखील एमआयएम आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली असून शिवसेनेच्या हिंदूत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.