...तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले, नितेश राणेंचा खोचक टोला
सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात बदलांनी वेग घेतला आहे. सेनेच्या खासदार, आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेची (shivsena) गळती रोखण्यासाठी सेना नेते आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरूवात होत आहे. दरम्यान, या शिवसंवाद यात्रेवरून आता नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. त्यामुळे आता भाजप-शिवसेना वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. (nitesh rane criticism to aaditya thackeray)
आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेवर भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी टि्वट केलं आहे. राणेंनी एक फोटो टि्वटमध्ये शेअर केला आहे. रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले, तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले, असं टि्वट नितेश राणेंनी करुन आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.
मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्यानंतर बोलताना बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि त्यापासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या या टि्वटला आदित्य ठाकरे काय उत्तर देतात, हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, शिव संवाद यात्रेची सुरुवात उद्यापासून (21 जुलै) होणार आहे. भिवंडीतून या यात्रेचा नारळ फुटणार आहे. यानंतर भिवंडी-नाशिक-दिंडोरी-संभाजीनगर आणि शिर्डी या ठिकाणी ही शिव संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान, आदित्य ठाकरे यांचा बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न असणार आहे. ठाकरे यांनी याआधी मुंबईत अशा प्रकारे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांची भेट घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.