Nitesh Rane News Updates Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंना कोर्टाचा झटका; पीए परबला 4 दिवसांची पोलिस कोठडी

नितेश राणे यांना जमीन देणार की अटक होणार हे काही तासातच समजणार आहे

तुषार सावंत

नितेश राणे यांना जमीन देणार की अटक होणार हे काही तासातच समजणार आहे

कणकवली - शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांना शरण आलेले नितेश राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांची चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. येथील पोलिसांनी आज त्यांना न्यायालयात (District court) हजर केले. राकेश परब (Rakesh Parab) यांना जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन फेटाळला गेला होता. त्यामुळे त्यांनी सोमवारी सकाळी येथील पोलिसांत शरणागती पत्करली. (Nitesh Rane News Updates)

दरम्यान नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जिल्हा न्यायालयातील अर्जावर सोमवारी दोन्ही पक्षाकडून बाजू मांडण्यात आली. त्याबाबतचा निकाल राखून ठेवला असून आज कोणत्याही क्षणी त्यांच्यावरील कारवाईही सुरू होणार आहे. त्यामुळे येथील शहर आणि परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राकेश परब यांची सोमवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज सकाळी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. नितेश राणे यांच्या बाबतचा निकाल आज दिवसभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालय त्यांना जमीन देणार की अटक होणार हे काही तासातच समजणार आहे. त्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे.

राणेंच्या कारवाईवर आज सुनावणी

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या न्यायालयीन शरणागतीबरोबर अटकेच्या कारवाईवर (३१) जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे आता राणेंसह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंतसह एकूण बारा संशयितांच्या पुढील कारवाईबाबत निर्णय होणार आहे. सावंत यांच्या अटकपुर्व जामीनावर (३१) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रचार प्रक्रियेदरम्यान शिवसेना कार्यकर्ते परब यांच्यावर १८ डिसेंबरला हल्ला झाला होता. या घटनेने राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्याच्यावतीने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले गेले. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. हल्ल्याच्या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणामागे राजकीय हात असल्याचे पुढे आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT