राज्यापालांच्या वक्तव्यासंदर्भात भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका भाषणात मुंबई शहराबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळं राज्यात तीव्र राजकीय पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या विधानावर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात आता भाजप आमदार नितशे राणे यांनी राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. (Nitesh Rane supported to Governor koshyari statement about mumbai)
राज्यापालांच्या वक्तव्यासंदर्भात भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार नितेश राणे ट्वीटमध्ये म्हणतात की, त्या त्या समाजाला त्यांच्या योगदानाचं श्रेय दिलं पाहिजे, राज्यपाल यांनी वक्तव्यातून हेच स्पष्ट केलं आहे. राज्यपालांकडून कोणाचाही अपमान झालेला नाही, त्यांनी त्या त्या समाजाला योगदानाचं श्रेय दिलं आहे. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांनी मराठी माणसाला आणि तरुणांना किती मोठं केलं हे स्पष्ट करावं, असंही त्यांनी फटकारलं आहे.
पुढे ते म्हणाले, सत्तेत असताना महाविकास आघाडी सरकारने किती मराठी तरुणांना मुंबई महापालिकेचे कंत्राट दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात. एवढेच कशाला शिवसेना पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदीकडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का ?, असा सवाल ही त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना केला आहे.
सध्या राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. आता भाजपच्या या भूमिकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये, अशा शब्दांत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यपालांची कानउघाडणी केली आहे. दरम्यान, आता यावर शिवसेना काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.