नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध आहेत. विरोधकांनाही ते आपलेच वाटतात. आज मंगळवारी (ता.पाच) आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी कामानिमित्त नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी रोहित तू बिनधास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समजं, असा शब्द त्यांनी आबांच्या लेकाला दिला. याबाबत रोहित पाटील (Rohit Patil) यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. रोहित लिहितात, दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे. ह्या वाक्याची प्रचिती आज आली. आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं अस समजं हे धीराचे होते. (Nitin Gadkari Assured Rohit Patil For Development Work In Tasgaon Taluka)
आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. तासगाव बाह्यवळण रस्ता हा प्रस्तावित असून काही काम अपूर्ण राहिले आहे. स्वर्गीय आबा असताना ह्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मानस त्यांचा होता. ह्या रस्त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना व नवीन तरुणांना व्यवसाय चालू करण्यासाठी संधी उपलब्ध या रस्त्यामुळे होऊ शकते आणि शहरातील दळणवळणसाठी अत्यंत फायदेशीर होऊ शकतो हे पटवून दिले. त्यामुळे सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा अशी विनंती त्यांना केली. नक्कीच हा बाह्यवळण रस्ता तासगावच्या विकासासाठी नवी नांदी असेल हा विश्वास मला आहे.
त्याचबरोबर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नगज-सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करुन दिला जावा, अशी विनंती केली. सदर दोन्ही कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश दिले असून लवकरच हे दोनही काम होतील, अशी हमी दिली. त्याच बरोबर साहेबांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीबाबत माहिती घेऊन अभिनंदन केले, असे रोहित यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.