Nitin Gadkari Interview 
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari Interview: "बाळासाहेबांनी मला बोलावलं अन् गिफ्ट दिलं, आजही मी..."; नितीन गडकरींनी सांगितला जुना किस्सा!

Sandip Kapde

Nitin Gadkari Interview: `सकाळ माध्यम समूहा`च्या वतीने आयोजित भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात प्रशांत दामले हे नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेत आहेत.

केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी विविध कार्यक्रमातून त्यांच्या विकास कामांविषयी व्यक्त होतच असतात. परंतु मनातले गडकरी रसिकांपुढे प्रत्यक्ष साकारण्याचे काम आज (शनिवारी) सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले करत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती आहे.

हॅप्पी ह्युमन इंडेक्स भारताचा वाढण्यासाठी भारतानं काय करायला हवं, असा प्रश्न नितिन गडकरी यांना विचारण्यात आला. यावेळी नितिन गडकरी म्हणाले, "भुतानच्या पंतप्रधानांनी एका भाषणामध्ये काही मुद्दे सांगितले होते. घर, शिक्षण, आरोग्य, शेतकरी यांचा विचार व्हायला हवा. यातून आनंद मिळतो. पण खरा आनंद तो माणूस हा महत्वकांक्षी असतो. मला लहानपणी सायकल हवी. मग नंतर मोटारसायकल हवी होती. डिलर्सला मी म्हणालो मला पिवळा आणि निळा रंग नको. दुसरा नको. माणसानं भविष्याचा विचार करु नये. जे देवानं दिले ते आपल्या क्षमतेपेक्षा जास्त दिले आहे असे मानले तर आपण आनंदी राहतो हे जास्त महत्वाचे आहे."

"आमदार असेल त्याला मंत्री व्हायचं असतं, जो मुख्यमंत्री असतो तो नेहमीच अस्वस्थ असतो, आपल्याला हायकमांड काढते की काय अशी भीती असते. आपण सतत काम करत राहावे, स्वप्न असावे, मिळालं किंवा नाही मिळाले याची चिंता करु नये. भविष्याचा विचार करु नका. गीता काय म्हणते यावर विश्वास ठेवा, जे होणार ते होऊ द्या. बाकी कसला विचार नको", असे नितिन गडकरी म्हणाले.

एक प्रोजेक्ट चालू होणार आणि वेळेवर अडचणी येतात. तेव्हा दु:ख होत नाही का?, या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. मी त्यांच्या घराच्या खाली उतरत होतो तेव्हा थापा मागे धावात आला. म्हणाला तुम्हाला साहेबांनी बोलावलं. मी बाबासाहेबांना म्हणालो साहेब काय झालं? यावेळी बाळासाहेब म्हणाले नितीन मला तुला एक वस्तू गिफ्ट द्यायची आहे. मी म्हटलं काय आहे. तर एका शिटवर लिहिलं होतं, I LIKE PEOPLE WHO CAN GET THE THINGS DONE. मी ते घेऊन आलो आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना दिले. नितीन मला प्रॉब्लेम नको सांगू नकोस, काम झाले पाहिजे. हे मला बाबासाहेबांनी सांगितले होते. ही गोष्ट मी नेहमीच लक्षात ठेवली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT