चांगलं काम केल्यानंतर लोक जातीचा विचार करत नाहीत. पुल देशपांडेंना कोणी जात विचारत नाही, शिवाजी महाराजांना आम्ही आई वडिलांपेक्षा जास्त माणतो... कोणही जातीच्या नेत्यांनी त्यांच्या जातीचा विकास किती केला पाहून घ्या. बहुसंख्य लोक जातीवर निवडणून येतात आणि आल्यानंतर माझ्या बायको, मुलगा किंवा चमच्यांसाठी तिकीट मागतात. कोणी माझ्या जातीतल्या दुसऱ्या व्यक्तीला तिकीट द्या नाही म्हणत.
माझा कोणीच- बायको, मुलगा, मुलगी राजकारणात नाही. मला एकदा प्रवीण दटके म्हणाले तुमच्या निखीलला अध्यक्ष करायचं . मी म्हणालो, एक काम कर माझा राजीनामा लिहून घे, मी बाजूला होतो त्याला अध्यक्ष कर. मी स्पष्ट सांगितलं मी राजकारणात आहे तोपर्यंत माझ्या घरातून कोणी राजकारणात येणार नाही आणि जर त्याला यायचं असेल तर मी पोस्टर चिटकवले, भिंती काळ्या चुन्याने रंगवल्या ते आधी कर. तिथून वर ये.
माझा मुलगा म्हणून माझ्या मांडीला मांडी लावून मी बसू देणार नाही. माझ्या राजकीय संपत्तीवर मला मोठं केलं त्या कार्यकर्त्यांचा आहे, मुलाबाळांचा नाही. माझी फिजीकल संपत्ती माझ्या कुटुंबाची आहे.
माणूस हा जातीने मोठा नाही गुणांनी मोठा आहे. जात,पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स यांनी माणून मोठा ठरत नाही. बॅकवर्डनेस बिकमींग ए पॉलिटीकल इंटरेस्ट. त्यामुले मला उत्तर प्रदेशात ब्राम्हण लोक भेटले. त्यांनी माझ्याकडे आरक्षणाची मागणी केली. तिथल्या आणि इथल्या ब्राम्हणांमध्ये फरक आहे. जसं इथं मराठ्यांचं वजन आहे तसं तिथं युपी, बिहारमध्ये दुबे, मिश्रा, त्रिपाठी मजबूत आहेत.ते म्हणाले देशात ब्राम्हणांचे नेते तुम्हीच आहात, काहीही करा आणि आरक्षण मिळवून द्या.
मी म्हणाले बिल्कूल मिळणार नाही. माझ्यावर उपकार झालेत. आई, बहिण नोकरी कर म्हणत होत्या. पण आरक्षण नसल्याने मी नोकरी केली नाही. पण त्यामुळे मी नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा बनलो. १५ हजार लोकांना मी नोकरी दिली, हे शक्य झालं कारण आरक्षण नव्हतं असे नितीन गडकरी म्हणाले.
तुम्ही सुरूवात केली तेव्हा आणि आताच्या राजकारणाच्या पद्धतीत काय फरक आहे? या प्रश्नला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, पर्स आणि पर्सन, पर्सन आणि पार्टी आणि पार्टी आणि फिलॉसॉफी यांच्यात फिलॉसॉफी महत्वाची आहे. मी १९७५ साली अकरावीत होतो. तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होतं. त्याच साली एमर्जन्सी लागली आणि त्याविरोधात मी काम करायला सुरूवात केली.
तेव्हा एमर्जन्सीच्या काळात लोकशाहीसाठी मी राजकारणात आलो. १९७७ साली मी प्रचारात आलो. आज देशात मतभिन्नता ही समस्या नाहीये, मतशुन्यता ही समस्या आहे. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. त्यामुळे आपण समाजाच्या सेवेकरिता काम केलं पा
"मी माझ्या भूमिकेशी प्रामाणिक आहे. मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की ओनरशीप घेतली पाहिजे. आमच्या राजकारणात बोटाने मलम लावण्यची सवय असणारी लोकं खूप आहेत. एकदा जबाबदारी घेतली तर इमानदारीने काम केलं पाहिजे. मी ओनरशीप घेऊन काम करतो म्हणून काम करू शकतो. हे प्रत्येक माणसाने केलं तर सगळी काम होतील" - नितीन गडकरी
युती कुठे आहे... जे होतील ते ते पाहावे, तुका म्हणे उगी रहावे....असे मला वाटते, असे उत्तर नितीन गडकरी यांनी दिलं.
शिवसेनेची सत्ता होती. मनोहर जोशी मुख्यमंत्री होती. तेव्हा मी खूप काही समस्यांमधून गेलो आहे. खूप उड्डाणपूल बांधले. त्यावेळी माझ्यावर कुणीही विश्वास ठेवत नव्हतो. तेव्हा मी धीरुबाई अंबानीचे टेंडर रद्द केले होते. मला पैशांची कमी नाही. मी आता ५० लाख कोटींची कामं करु शकतो.
देशात प्रमाणिकपणे काम करणाऱ्यांची कमी आहे. पैशांची कमी नाही. फक्त चांगली माणसे हवीत. नाटकं मागून पाहायचो आणि सिनेमे पुढून पाहायचो. अशी आठवण गडकरी यांनी सांगितली.
तुम्ही काही महिने एका प्रोजेक्टवर काम केल्यानंतर शेवटच्या टप्प्यात काही अडचण आल्यानंतर दुखः होत नाही का? या प्रश्नावर उत्तर देताना गडकरी म्हणाले की, बाळासाहेबांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांनी मला एक वस्तू भेट दिली होती. त्यांनी दिलेल्या गिफ्टवर लिहीलं होतं 'आय लाइक पीपल हू कॅन गेट द थींग्ज डन'. ते मला म्हणाले की, मला प्रॉब्लेम नको सांगूस, काम झाले पाहिजे. ही गोष्ट मी नेहमीच लक्षात ठेवली. समस्या कोणाच्या जीवनात नाहीत सगळ्यांच्या जिवनात आहेत.
नितीनजी सर्वांना आनंदी राहायला आवडतं, तर भारताचा हॅप्पी ह्युमन इंडेक्स वाढण्यासाठी तुमच्या कल्पना काय आहेत? भूतानच्या पंतप्रधानांनी युएनमध्ये कलेले भाषणात डोमेस्टीह हॅप्पी इंडेक्सची व्याख्या मांडली, भुतानच्या पंतप्रधानांनी एका भाषणामध्ये काही मुद्दे सांगितले होते. घर, शिक्षण, आरोग्य, शेतकरी यांचा विचार व्हायला हवा. यातून आनंद मिळतो.
माणसानं भविष्याचा विचार करु नये. जे देवानं दिले ते आपल्या क्षमतेपेक्षा जास्त दिले आहे असे मानले तर आपण आनंदी राहतो हे जास्त महत्वाचे आहे असे उत्तर नितीन गडकरी यांनी दिलं.
आयुष्यात आर्थीक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या काम, प्रयत्न करत राहावं. मिळालं नाही मिळालं याचा फार विचार करू नये. आनंदात राहण्याचा हा चांगला मार्ग आहे. भविष्याचा विचार करणं सोडून द्या असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
मनातले गडकरी’ या नितीन गडकरी यांच्या मुलाखतीला सुरूवात झाली असून अभिनेते प्रशांत दामले हे ही मुलाखत घेत आहेत.
आपल्याशी संवाध साधण्यासाठी आलेले नितीन गडकरी यांचं मी स्वागत करतो. त्यांची मुलाखत कोण घ्यावी अशी विचारणा होत होती. तो जर अभिनय क्षेत्रातील व्यक्ती असेल तर तो दादा व्यक्ती असला पाहिजे असं वाटत होतं. त्यानंतर प्रशांत दामले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नितीन गडकरी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर गडकरींचं काम सगळ्यांना माहिती आहे. त्यांना एखादी संधी साहेबांना मिळाली तर त्याचं सोनं कसं करावं यासाठीचे ते मुर्तिमंत उदाहरण आहेत. - संदीप भारंबे, कार्यकारी संपादक, विदर्भ आवृत्तीचे
'मनातले गडकरी' या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलखतीच्या कार्यक्रमासाठी अभिनेते प्रशांत दामले, सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे हे देखील उपस्थित आहेत. यावेळी संदीप भारंबे यांच्या हस्ते नितीन गडकरी यांचं स्वागत करण्यात आलं.
`सकाळ माध्यम समूहा`च्या वतीने आयोजित भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात प्रशांत दामले हे नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. आजवर नितीन गडकरी यांना त्यांच्या अचाट आणि अफाट विकास कामासंबंधी ऐकण्याचा श्रोत्यांना अधिक अनुभव आहे. परंतु `मनातले गडकरी` ऐकण्याचा अपूर्व आणि मनमूराद आनंद पहिल्यांदाच लाभणार आहे.
गडकरींची दिगंतापार ख्याती, मनामनात सन्मानाचे स्थान
देशाच्या कल्याणासाठी समर्पित व्यक्तिमत्व म्हणून नितीन गडकरी यांची ख्याती दिगंतापार पोहोचली आहे. भविष्यवेधी, दूरदर्शी, कर्मयोगी, लोकसेवक, समाजसुधारक अशा कित्येक विलक्षण विशेषणांनी नितीन गडकरी यांना गौरवान्वित करून लोकांनी त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले आहे. कोट्यवधी मनात त्यांची अशी आणि याहूनही चमकदार प्रतिमा आहे. पण त्यांच्या मनात नेमकं काय आहे? अजातशत्रू असलेल्या या महान नेत्याच्या मनातले ऐकून घेण्याची संधी त्यांच्या प्रकट मुलाखतीतून मिळणार आहे. सोबतच नितीन गडकरी यांच्या अभूतपूर्व कार्यावरील `कॉफी टेबल बुक`चे प्रकाशन आणि त्यांचा भव्य `कृतार्थ सत्कार` सोहळा हा दुग्धशर्करा योगही याच कार्यक्रमातून लाभणार आहे. (Sakal Coffee table book)
केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी विविध कार्यक्रमातून त्यांच्या विकास कामांविषयी व्यक्त होतच असतात. परंतु `मनातले गडकरी` रसिकांपुढे प्रत्यक्ष साकारण्याचे काम आज (शनिवारी, ता. २१) सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.