Nitin Gadkari 
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी चक्क 50 किलो वजन कसं कमी केलं? जाणून घ्या त्यांचं संपूर्ण वेळापत्रक अन् आहार

Sandip Kapde

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही वर्षात 50 किलो वजन कमी केले आहे. गडकरी यांचे वजन 135 किलोपर्यंत वाढले होते. आता ते 85 किलो झाले आहे, नितीन गडकरींनी 50 किलो वजन कसं कमी केलं, त्यांचे संपूर्ण वेळापत्रक आणि आहाराची माहिती त्यांनी एका मुलाखतीत दिली आहे.

गडकरी म्हणाले, मी 2011 पासून प्रयत्न करत आहे आणि 12 वर्षांत माझी संपूर्ण जीवनशैली बदलली आहे. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यात पूर्वी कोणतेही वेळापत्रक नव्हते. तसेच मला जेवणात खूप रुची होती. पण आता फारसा आहार नाही आणि मी दोन्ही वेळी दोन चपाती खातो, थोडा भात, डाळ आणि भाजी खातो.

आपल्या आरोग्याचे रहस्य सांगताना नितीन गडकरी म्हणाले की, ते दररोज दीड तास चालण्यात आणि प्राणायाम करण्यात घालवतात. (latest marathi news)

"मी अन्नाचे प्रमाण नियंत्रित केले असून मला प्राणायामाचा खूप फायदा झाला आहे. माझ्या शरीरात इतका बदल झाला आहे याचा मला आनंद आहे. माझे संपूर्ण आयुष्यच अनियमित झाले होते तसेच खाण्यापिण्यात कोणती शिस्त नव्हती. पण आता त्यावर नियंत्रण आले आहे," असे गडकरी यांनी सांगितले.  

नितीन गडकरी म्हणाले, "पूर्वी जेवायला बसलो की पूर्ण ताट रिकाम करायचो, पण आता संयम आहे. मी आता मर्यादितच खातो. माझा खाण्याचा बेत कमी झालेला नाही. बर्‍याचदा संध्याकाळी मी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जातो, पण आता जेवणाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे."

कुठे पदार्थ आवडतात, दिल्ली की मुंबई?

दिल्लीत बटाट्याचे पराठे आणि पनीर सर्रास मिळतात. पण मुंबईतल्या खाण्यापिण्याची विविधता इथे तितकीशी नाही. मुंबईत मध्यरात्रीही सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मी जेव्हाही मुंबईला पोहोचतो तेव्हा अनेकवेळा बाहेर जेवायला जातो, असे गडकरी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

ACMC Solar Holding : एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या आयपीओकडून गुंतवणुकदारांची निराशा, शेअर्स 13% डिस्काउंटवर लिस्ट...

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

SCROLL FOR NEXT