Nitin Gadkari medha kulkarni esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari : भाजपमधला अंतर्गत वाद मिटणार? नितीन गडकरी मेधा कुलकर्णींच्या भेटीला

संतोष कानडे

पुणेः पुण्यातील चांदणी चौक येथील पुलाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपमधली अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचं बघायला मिळालं. भाजपच्या जुन्या नेत्या मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

पुण्यातील चांदणीचौक येथील पुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (१२ ऑगस्ट) पार पडलं. या लोकार्पण सोहळ्यात एक वेगळचं नाराजीनाट्य पाहयला मिळालं. कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याने चर्चांना उधाण आले होते.

"असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं" अशा आशयाची पोस्ट मेधा कुलकर्णी यांनी केली होती. या पोस्टमध्ये मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या मनातील नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मात्र आजच्या चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला मेधा कुलकर्णी उपस्थित राहिल्याचे पाहायाला मिळालं.

आता नितीन गडकरी हे मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले आहेत. मेधा कुलकर्णी यांचा स्वभाव आक्रमक समजला जातो. आपल्याला डावललं जात असल्यामुळे चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर त्यांनी नाव न घेता आरोप केले आहेत.

नितीन गडकरींच्या भेटीमुळे मेधा कुलकर्णींना काय साध्य करायचं आहे, हा प्रश्न निर्माण होतोय. नितीन गडकरी भाजपमधला अंतर्गत वाद मिटवतील का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. नुकत्याच झालेल्या मोदी शाहांच्या कार्यक्रमातही आपल्याला डावलल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला होता.

मेधा कुलकर्णीं काय म्हणाल्या?

'असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं'

"माझ्यावरील कुरघोडया, डावलणं याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही... पण आता दुःख मावत नाही मनात... वाटलं बोलावं तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रकं पहिली आणि खूप वाईट वाटलं.

चांदणी चौक या विषयाचं सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT