Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राजन साळवींना धक्का? मविआ नगरसेवकांचा चक्क शिवसेनेला पाठिंबा!

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याप्रमाणेच आता स्थानिक पातळीवर देखील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांना पदावरुन हटवण्यासाठी शिंदे गटाकडून अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. पूर्वा मुळे या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष आहेत.

दरम्यान लांजा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्यावर शिवसेनेने (शिंदे गट गटाने) अविश्वास ठराव दाखल केला असून आज (सोमवारी 17 एप्रिल) मतदान होणार आहे. मात्र, पूर्वा मुळे यानी 15 सदस्यांना व्हीप बजावल्याने लांजातील राजकारण तापलं आहे. या अविश्वास ठरावाच्या घडामोडीवर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे सदस्य सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.

शिंदे गटाकडे बहूमत असल्याने हा ठराव संमत होणार का याकडे लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील शिवसेनेचे दोन गट तयार होऊन स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ही या बंडाचे थेट परिणाम झाले आहेत. लांजा नगर पंचायतमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 15 सदस्य सह गटनेते पद हे पूर्वा मुळे यांच्याकडे आहे. त्या सध्या उपनगराध्यक्ष आहेत. नगराध्यक्ष मनोहर बाईत याच्यासह 10 जणांनी भाजपचे दोन सदस्य घेऊन वेगळा गट तयार केला आहे.

लांजा शहरातील राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, संदीप दळवी, जगदीश राजापकर यांनी ठाण मांडले आहे. तर दुसरीकडे सामंत गट, राणे सह बड्या नेत्यांनी लांजातील नगर पंचायत हालचालींवर लक्ष केंद्रित केलं आहे. उपनगराध्यक्षसाठी भाजपचे संजय यादव, मंगेश लांजेकर आणि शिंदे गटाचे सचिन डोंगरकर हे दावेदार आहेत. दोन अपक्ष आणि काँग्रेस दोन सदस्य हे पूर्वीच्या 15 जणांच्या गटात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

IND vs NZ, Test: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा! लॅथमकडे नेतृत्व, तर विलियम्सन उशीराने येणार

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

SCROLL FOR NEXT