औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. याबाबत स्वतः काँग्रेस मंत्र्यांनी सांगितले आहे. मित्रपक्षांमध्ये स्पर्धा आहे. मात्र काँग्रेसला न्याय मिळत नसल्याची खंत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा काँग्रेसचे औरंगाबदचे संपर्कमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथे सोमवारी (ता.२४) काँग्रेसच्या वतीने आयोजित डिजिटल सदस्य नोंदणी व प्रशिक्षण शिबीराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून दिले त्या संघटनेचे नाव काँग्रेस आहे. काँग्रेसचा (Congress Party) इतिहास पुसून टाकण्यात येत असून एखाद्याची हवा फार काळ टिकणार नाही.(No Justice To Congress In Mahavikas Aghadi Government, Said Amit Deshmukh)
सर्वधर्म समभावाचा विचार मागे पडत असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारणापेक्षा सहकार महत्त्वाचा असतो, असे म्हणत कल्याण काळे यांची पाठ त्यांनी थोपवली. या प्रसंगी उपस्थित ग्रामीणचे निरीक्षक शिरीष चौधरी म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसला ताकद द्या. यावेळ औरंगाबाद जिल्हा दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीतील विजयी काँग्रेस संचालकांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.(Mahavikas Aghadi Government)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.