Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'अकारण कोणाला नोटीस येत नाही', अजित पवारांचा रोहित पवारांना टोला.. काका पुतण्या वाद चिघळणार?

रोहित पवारांना दिलेल्या नोटीस देण्यात आली त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे

सकाळ वृत्तसेवा

‘‘अकारण कोणाला नोटीस येत नाही. कोणीही जाणून-बुजून हे करत नसते. फक्त काही जणांबद्दल बातम्या येतात. नोटीस देणारी यंत्रणा त्यांचे काम करत असते. त्याला उत्तर दिले की, तो विषय संपतो. या गोष्टीला कोणी वेगळे राजकीय स्वरूप देऊ नये, अशी माझी विनंती आहे,’’ असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना दिला.

पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याला पर्यावरण विभागाची नोटीस आली आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘‘मागच्या वेळी श्रीनिवास पवार यांच्या शरयू ॲग्रो या कारखान्याला नोटीस आली होती. आमच्याही काही युनिटला अशीच नोटीस आली होती. ही एक प्रक्रिया असते. कोणताही कारखाना चालवत असताना तसेच पर्यावरणाचा विचार करता ‘झीरो डिस्चार्ज’चा विचार करणे गरजेचे आहे.’’

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केल्याची नोटीस आली होती. 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसीतून देण्यात आली आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

"दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली." असं त्यांनी म्हटलं होतं.

रोहित पवार यांचं ट्वीट

'दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.'

'युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.'

'हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.'

'आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे.'

'असो! पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील',असं रोहित पवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT