On This Day:  Sakal
महाराष्ट्र बातम्या

On This Day: आजच्या दिवशी भारतीय परराष्ट्र सेवेला सुरवात झाली तर उत्तर कोरियाने पहिली आण्विक चाचणी घेतली,जाणून घ्या महत्वाच्या घडामोडी

9 October in History: आजच्या दिवशी कोणत्या खास घडामोडी घडल्या हे एका क्लिकवर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

9 October in History: आजच्या दिवशी भारतीय परराष्ट्र सेवेला सुरवात झाली तर उत्तर कोरियाने पहिली आण्विक चाचणी घेतली होती. तसेच आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

२००७:  डाऊ जोन्स औद्योगिक सरासरीने १४,१६४पॉइंट्सच्या सर्वकालीन उच्चांक गाठला, त्यानंतर लावकरच २००८ ची आर्थिक मंदी येणार होती.


२००६: उत्तर कोरिया देशाने पहिली आण्विक चाचणी घेतली.


१९८६: द फॅंटम ऑफ द ऑपेरा लंडनमधील दुसरे सर्वात जास्त काळ चालणारे संगीत, सुरु झाले.


१९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाई दलाकडे सुपुर्द केले होते.


१९६७: अर्नेस्टो 'चे' गुएवारा पकडल्याच्या एका दिवसानंतर, बोलिव्हियामध्ये क्रांती भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फाशी देण्यात आली.


१९६३: इटलीत मोठ्या भूस्खलनामुळे वाजोंट धरणाच्या वरून लाट आली आणि किमान २ हजार लोकांचे निधन.


१९६२: युगांडा स्वतंत्र राष्ट्रकुल क्षेत्र बनले.


१९४६: भारतीय परराष्ट्र सेवेला सुरवात झाली.


१९३६: हूवर डॅम मधून वीज निर्मिती करण्यास सुरवात झाली.


१९१४: पहिले महायुद्ध अँटवर्पचा वेढा संपला.

१८७४: युनिव्हर्सल पोस्टल युनियन बर्नच्या कराराद्वारे तयार करण्यात आले.


१८७३: यू.एस. नेव्हल इन्स्टिट्यूट स्थापना झाली.


१८४७: स्वीडिश वसाहतीत गुलामगिरी संपुष्टात आली.


१८२०: ग्वायाकिल देशाने स्पेनपासून स्वातंत्र्य घोषित केले.


१७९०: उत्तर अल्जेरियात भूकंपामुळे भूमध्य समुद्रात निर्माण झालेल्या त्सुनामी मुले किमान तीन हजार लोकांचे निधन झाले


१७६०:  रशियन आणि ऑस्ट्रियन सैन्याने बर्लिनवर कब्जा केला.


१७४०: डच वसाहतवादी आणि जावानीज मूळ लोकांनी बटाव्हियामधील वांशिक चिनी नागरिकांची हत्या करण्यास सुरवात केली, त्यात किमान १० हज़ात लोकांची हत्या.


१७०१: येल युनिव्हर्सिटी, अमेरिका सुरुवात झाली.


१६०४: केपलरचा सुपरनोव्हा - हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आलेला सर्वात अलीकडील सुपरनोव्हा आहे.


१४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.


१४१०: प्राग खगोलीय घड्याळ प्रथम उल्लेख करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT