sakal exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

पहिल्या प्रशिक्षणाला जवळपास 2 हजार कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. ते दुसऱ्या प्रशिक्षणाला येतील, अशी आशा होती. पण, 872 कर्मचारी दुसऱ्या प्रशिक्षणालाही गैरहजर राहिले. त्यांना आता नोटिसा बजावल्या असून खुलासा असमाधानकारक असल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी १९ हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येकाला इलेक्शन ड्युटीसंदर्भातील आदेश पाठविण्यात आले. तरीपण, पहिल्या प्रशिक्षणाला जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. ते दुसऱ्या प्रशिक्षणाला तरी येतील, अशी आशा होती. पण, जवळपास एक हजार कर्मचारी दुसऱ्या प्रशिक्षणालाही गैरहजर राहिले. त्यांना आता नोटिसा बजावण्यात आल्या असून खुलासा असमाधानकारक असल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर गुन्हेही दाखल केली जातील, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात तीन हजार ७२३ मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर किमान चार कर्मचारी लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाने विविध विभागातील १९ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी दिली असून त्यातील काहींची ड्युटी अडचणींमुळे रद्द करण्यात आली आहे. तर काहींना दोन दोन ठिकाणी ड्युटी आली असून त्यात काहीजण निवृत्त कर्मचारी पण आहेत. दरम्यान, आता दुसरे प्रशिक्षण पार पडल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांचे मतदानापूर्वी शेवटचे प्रशिक्षण होणार आहे.

तत्पूर्वी, सर्व कर्मचारी ड्युटीवर असणे आवश्यक आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांना पुन्हा स्वतंत्रपणे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या गैरहजर कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या संपर्क साधून कितीजण ड्युटीसाठी यायला तयार आहेत, किती जणांना दुबार ड्युटी आली आहे, कोण सेवानिवृत्त झाले आहे, याचा आढावा गुरुवारी (ता. १४) दिवसभर घेण्यात आला. जे कर्मचारी काहीतरी कारण सांगून ड्युटी टाळत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शिस्तभंगाच्या कारवाईसाठी संबंधित विभागाला प्रस्ताव सादर केले जाणार आहेत.

‘ही’ कारणे सांगून ड्युटी टाळण्याचा प्रयत्न

घरातील किंवा जवळचा नातेवाईक मयत झाला आहे. स्वत:चा किंवा कुटुंबातील सदस्याचा अपघात झाला आहे. मुलगा, पती, आई, सासू गंभीर आजारी आहे. माझी शस्त्रक्रिया झाली आहे, ॲडमिट आहे अशी अनेक कारणे सांगून काहीजण इलेक्शन ड्युटी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनुभव अधिकाऱ्यांना येत आहेत. पण, त्या कारणांची पडताळणी होणार असून खोटी कारणे देणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे.

तहसील कार्यालयातून ड्युटीवर येण्यासाठी संपर्क

मतदानाची तारीख पाच दिवसांवर असतानाच पहिल्या-दुसऱ्या प्रशिक्षणाला किंवा दोन्हीपैकी एका प्रशिक्षणाला दांडी मारलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून तत्पूर्वी जिल्ह्यातील तीन हजार ७२३ मतदान केंद्रांसाठी पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध आहेत की नाहीत, याचा आढावा घेतला जात आहे. जे कर्मचारी परस्पर प्रशिक्षणाला गैहजर राहिले, त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. दुसरीकडे त्या सर्वांना कारवाईपूर्वी शेवटची संधी म्हणून तहसील कार्यालयातून संपर्क केला जात आहे.

गुन्हे दाखल होतील अन्‌ शिस्तभंगाचीही कारवाई

कोणतीही अडचण नसताना देखील काहीतरी कारण सांगून इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या तथा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला परस्पर गैरहजर राहिलेल्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांना एक संधी देवून ड्युटीवर हजर राहण्यास बजावले जात आहे. नाहीतर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शिस्तभंगाच्या कारवाईसाठी त्यांच्या त्यांच्या विभागप्रमुखाकडे प्रस्ताव पाठविले जातील.

- सदाशिव पडदुणे, निवडणूक निर्णय अधिकारी, शहर मध्य, सोलापूर

प्रशिक्षणासाठी गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस

  • मतदारसंघ गैरहजर कर्मचारी

  • शहर मध्य ४२

  • माळशिरस ३४

  • मोहोळ १००

  • पंढरपूर-मंगळवेढा १४२

  • अक्कलकोट १३०

  • करमाळा ७७

  • बार्शी ६४

  • सांगोला १२२

  • माढा ६७

  • दक्षिण सोलापूर ७२

  • शहर उत्तर ८९

  • एकूण ८७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT