schools sakal
महाराष्ट्र बातम्या

१०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे आता ‘क्लस्टर’! स्थलांतरित शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार ६००० रुपयांचा प्रवासखर्च

सध्याच्या कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थलांतरित शाळांमध्ये ये-जा करण्यासाठी वर्षाला सहा हजार रुपयांचा प्रवासखर्च दिला जाणार असून तसा शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदांच्या ६० हजार शाळांपैकी दीड हजारांहून अधिक शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी आहे. त्यामुळे खर्चाची बचत आणि दुसऱ्या शाळांना पुरेसे शिक्षक मिळावेत म्हणून त्या शाळा आता एक ते तीन किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळांमध्ये समाविष्ट होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थलांतरित शाळांमध्ये ये-जा करण्यासाठी वर्षाला सहा हजार रुपयांचा प्रवासखर्च दिला जाणार असून तसा शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे.

पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग, दोन शिक्षक आणि विद्यार्थी केवळ पाच किंवा सहाच, अशी अवस्था जिल्हा परिषद शाळांची झाली आहे. पाच-सहा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र इमारत, दोन शिक्षक व इतर खर्च शासनाला परवडणार नाही. त्यामुळे आता त्या शाळा जवळच्याच शाळांमध्ये समायोजित करून तेथील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची उपलब्धता करून दिली जाणार आहे. पानशेतच्या (जि. पुणे) धर्तीवर राज्यात कमी पटसंख्येच्या शाळांचे ‘क्लस्टर’ तयार केले जात आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एका विद्यार्थ्याला वर्षाकाठी सहा हजारांचा प्रवासखर्च देण्याचेही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चापेक्षाही सध्या कमी पटसंख्येच्या शाळांवरील खर्च मोठा आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १० ते २० पटसंख्येच्या शाळांबाबतही निर्णय होऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

संचमान्यतेनुसार झेडपीत २३७१६ शिक्षक कमी

राज्यात जिल्हा परिषदांच्या ६० हजार शाळा असून त्यापैकी बहुतेक शाळांची संचमान्यता पूर्ण झाली आहे. आधारकार्ड नाही, पण तो विद्यार्थी शाळेत दररोज येतोय, याची खात्री गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकाऱ्यांनी करून तसा अहवाल त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना द्यायचा असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आधार नसलेले विद्यार्थी देखील संचमान्यतेत ग्राह्य धरले जातील. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण अत्यल्पच राहील. सध्याच्या संचमान्यतेनुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये २३ हजार ७१६ तर खासगी शाळांमध्ये अंदाजे ३० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदांची भरती पहिल्या टप्प्यात होणार आहे.

झेडपी शाळांची सद्य:स्थिती

  • अंदाजे एकूण शाळा

  • ६०,०००

  • दोन वर्षात पट घटला

  • ३.१४ लाख

  • १ ते १० पटाच्या शाळा

  • १,५२९

  • विद्यार्थ्यांना वार्षिक प्रवासखर्च

  • ६०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT