Chief Minister Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Transgender Scheme: बहिण झाली, भाऊ झाला आता तृतीयपंथीयांकडून 'लाडका' योजनेची मागणी; मुख्यमंत्र्यांना केलं आवाहन

राज्य शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी योजना जाहीर केल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राज्य शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. त्यातच आता या दोन्हींचा लाभ मिळू न शकणारा वर्ग अर्थात तृतीयपंथीयांनी आपल्यासाठी सरकारनं 'लाडका' योजना जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

चंद्रपुरात मनसेच्या पुढाकारानं तृतीयपंथीयांच्या संघटनेनं या विशेष योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्र्यांकडं ही मागणी केली आहे. तृतीयपंथी समाज हा दुर्लक्षित आणि वंचित घटक असल्याची आठवण निवेदनातून करून देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात बहिणी आणि भावांसाठी सरकारच्या योजना सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांनी देखील आवाज उचलला आहे. राज्य सरकारच्यावतीनं सध्या जाहीर करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांसाठीच्या योजनांची देखील सुयोग्य अंमलबजावणी होत नसल्याचं मनसेनं सरकारच्या लक्षात आणून दिलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं तृतीयपंथीयांनी 'लाडका' योजना राबवण्यासाठी आग्रह धरला. याची दखल घेत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT