NPCI and Sakal media Group spread awareness of upi online fraud for warkari Sakal
महाराष्ट्र बातम्या

सुरक्षित वारी ! वारकऱ्यांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी NPCI आणि सकाळ समुहाची हातमिळवणी

सकाळ वृत्तसेवा

नॅशनल पेमेंट काॅरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि सकाळ वृत्तपत्र समुह च्या सहकार्याने दि.१ जुलै ते १8 जुलै मध्ये होणाऱ्या पंढरपूर वारीत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची सुरॢक्षितता महत्त्वपूर्ण धरून भक्तांच्या सेवेसाठी आणि बाजारात आलेल्या नवनवीन अँपमधील गैरप्रकारांपासुन वारकऱ्यांना जागरूक करण्यासाठी, ऑनलाईन पेमेंट किंवा पैसे पाठवताना होणाऱ्या फसवणुकीपासुन संरक्षण होण्यासाठी हा उपक्रम राबविला गेला . ही माहीती वारकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत पथनाट्या द्वारे देण्यात आली.

ऑनलाईन पेमेंट किंवा पैसे पाठवताना होणाऱ्या फसवणुकीपासुन संरक्षण होण्यासाठी हा उपक्रम राबविला गेला . ही माहीती वारकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत पथनाट्या द्वारे देण्यात आली.

पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी लाखो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर ची वारी करतात. संपुर्ण भारतातून वारकरी चालत पंढरपुरात दाखल होतात.

या वर्षी तर हा आकडा 15 लाखाच्याही पुढे गेला. या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी सुद्धा समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते. सतत चालत असताना मोबाईल फोन चार्ज कसे करायचे हा एक प्रश्न असतो आणि म्हणुनच वारकरी बांधवांच्या सोयीसाठी आपल्या व्हॅन वर 44 चार्जिंग पॉईंट्स च्या माध्यमातून मोफत मोबाईल चार्जिंग ची सोय करण्यात आली होती.

आज UPI पेमेंट चा वापर गावा गावा पर्यंत पोहोचला आहे , सुट्टे पैसे बाळगायची गरज नाही aani आणि सुरक्षितताही. BHIM UPI हे आपले भारतीय अँप NPCI ने विकसित केले आहे . ह्या उपक्रमाद्वारे BHIM UPI अँप ची माहीती, अँप डाउनलोड कसे करता येते ह्याबद्दल लोकाना शिकवले गेले.

आपल्या पैकी बहुताना वाटते की स्मार्ट फोन शिवाय UPI व्यवहार करताच येत नाही . पण NPCI च्या 123pay द्वारे लोक साध्या फोनद्वारे सुद्धा सुरक्षिततेने आणि सहजपणे पैसे ट्रान्सफर करता येतात हे आम्ही लोकाना दाखवून दिले.

भक्तांच्या दिंड्यां बरोबरच आमच्या या ज्ञानप्रबोधक दिंडीचे ही सगळीकडेच कौतुकास्पद स्वागत झाले. UPI चा वापर सर्वदूर पसरल्या मुळे बरेचसे विक्रेते ह्या माध्यमातून पैसे स्वीकार करतात. वारीच्या आणि खुद्द पंढरपुरातील हजारो विक्रेत्यांना भेटून आपल्या टीमनी UPI च्या स्वीकारा बाबत आणि लागणार्‍या प्रोसेस बद्द्ल माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT