Devendra Fadnavis Devendra Fadanvis
महाराष्ट्र बातम्या

Fadnavis on OBC: "कोणी वाटेकरी होईल असा गैरसमज ओबीसींनी करुन घेऊ नये"; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. ओबीसींमधून कुणबी समाजाचं आरक्षण मिळावं यासाठी मराठा नेते मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. सरकारही युद्धपातळीवर मराठा आरक्षणासाठी हालचाली करत आहे, त्यामुळं ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजानं आपल्या आरक्षणात कोणी वाटेकरी होईल असा गैरसमज करुन घेऊ नये, असं म्हटलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. (OBCs should not misunderstand that anyone will participate in there reservation says Devendra Fadnavis)

फडणवीस म्हणाले, आमचं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या मनात जी भीती आहे की आमचं आरक्षण काढून घेणार किंवा त्यात कोणी वाटेकरी होणार. पण सरकारचा असा कुठलाही हेतू नाही. (Latest Marathi News)

ओबीसी समाजानं असा गैरसमज करुन घेऊ नये. दोन समाज समोरासमोर यावेत असा कुठलाही निर्णय राज्य सरकार होऊ देणार नाही, असा कोणीही प्रयत्न ही करु नयेत. तसेच कुठल्याही समाजानं कुठलंही स्टेटमेंट देताना कुठलाही समाज दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं आवाहनही यावेळी फडणवीस यांनी केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सर्वपक्षीय बैठकीचा अजेंडा काय?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीचा अजेंडा काय असेल याची माहितीही यावेळी फडणवीसांनी दिली. फडणवीस म्हणाले, "सगळ्यांनी मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो.

आजची जी बैठक आहे त्याचा प्रयत्न हाच असणार आहे की, आपल्याला कुठल्या मार्गानं पुढे जाता येईल. जरांगेंच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत. तसेच मराठा संघटनांच्या काही इतर मागण्या आहेत. त्यामुळं राजकारण्यांनी यावर राजकारण न करता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल? यावर विचार करायल हवा.

मुख्यमंत्र्यांचं जरांगेंशी बोलणं झालं

मुख्यमंत्र्यांनी स्वतः जरांगेंशी बोलून त्यांना उपोषण संपवण्याचं आवाहन केलं आहे. उपोषण करणं ही लोकशाहीतील पद्धत आहे. पण त्याचवेळी सर्वांनी मिळून असे प्रश्न सोडवण्यासाठी काय मार्ग काढता येईल.

शेवटी सरकारलाही कायद्याचा विचार करावा लागतो, प्रश्न सोडवायचे असतील तर ते कायद्याच्या चौकटीतही टिकलं पाहिजे नाहीतर समाज म्हणणार की तुम्ही आमची फसवणूक केली. मला विश्वास आहे की सर्वांनी मिळून सकारात्मक विचार केला तर समाजाचं भलं होईल आणि निश्चितपणे अशा प्रकारचे प्रश्न सुटतील, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT