Aditya Thackeray sakal media
महाराष्ट्र बातम्या

दक्षिण आफ्रिकेतून हजारभर लोक मुंबईत आले; आदित्य ठाकरेंची खळबळजनक माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती दिली आहे. गेल्या दहा नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून जवळपास 1 हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. ही माहिती आदित्य ठाकरे यांनीच दिली आहे. हे प्रवासी फक्त मुंबईतच नव्हे तर मुंबईतून इतर शहरात देखील गेले आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण किती प्रवासी आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात किती प्रवासी गेले आहेत, याची छाननी सध्या सुरु आहे. आदित्य ठाकरे यांनी माहिती देताना सांगितलंय की, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सध्या सुरु आहे. त्यांना फोन करुन, त्यांचे पत्ते मिळवून त्यांना संपर्क साधण्यात येतो आहे.

याबाबत माहिती देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की, आतापर्यंत दहा नोव्हेंबर पासून साऊथ आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांना ट्रेस केलेलं आहे. बीएमसीने त्यांना कॉलिंग सुरु केलं आहे. परदेशातून आलेल्या सर्वांनाच आपण संपर्क साधणार आहोत. ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन वाढत आहे, त्या देशातून आलेल्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करु, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अशातच डोंबिवलीत केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्रासह राज्य सरकार सतर्कता बाळगत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावलीतयार करण्यात आली आहे. दरम्यान हा ओमीक्रोन कितपत धोकादायक आहे? याबाबत दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टर्सनी (south africa) माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

SCROLL FOR NEXT