Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: निधीवाटपात आमदारांवर अन्याय? अजित पवारांकडून १५० कोटींचा निधी मिळाल्यावर भरत गोगवले यांचं स्पष्टीकरण

काही आमदारांना भरघोस निधी देण्यात आला यावरून राज्यात विरोधकांनी टीका केली यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवार यांच्याकडून आमदारांना निधी वाटप करण्यात आलं आहे. त्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु झालं आहे. आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी देण्यात आला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना निधी वाटपात झुकतं माप दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांसोबत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरभरुन निधी देण्यात आल्याचंही काही नेत्यांनी म्हटलं आहे. तर यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.

निधीवाटपात अपहार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर, निधीवाटप हा संशोधनाचा विषय असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. दरम्यान, चांगलाच निधी मिळालेले शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. निधीवाटपात कोणावरही अन्याय होऊ दिला नाही, असंही ते म्हणाले आहेत. आज विधानभवनाबाहेर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

पुढे आमदार भरत गोगावले म्हणाले की, 'सर्वांना व्यवस्थित निधी दिला आहे. कोणाचीही तक्रार नाही. कोणाला तक्रार असेल तर आम्हाला सांगा. आपल्या मतदारसंघातील कामे सुचवली होती, त्यांना तसा निधी मिळालेला आहे. ज्यांना कमी कामं सुचवली, कोणी जास्त सुचवली. जी कामं सुचवली त्या अनुषंगाने निधी मिळाला.'

'एखादा अपवाद असेल तर सुधारणा करता येईल. कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली आहे. आमदार समाधानी आहेत, काळजी करण्याचं कारण नाही', असं आमदार भरत गोगावले यांनी म्हंटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Manifesto 2024: भाजपच्या जाहीरनाम्यात 'विकसित महाराष्ट्र' संकल्पना; शेतकऱ्यांसाठी हमीभाव, बहिणींना भेट म्हणून २१०० रुपये

Nitin Gadkari: भाजपचं पीक वाढलंय, रोग लागतो आता फवारण्याची गरज; नितीन गडकरींनी का व्यक्त केली चिंता?

Dharashiv Assembly Election 2024 : धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेत थेट लढत!

Star Pravah : मृणाल दुसानिस आणि ज्ञानदा रामतीर्थकरचा मालिकेत कमबॅक ; नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस

Manoj Jarange Patil : तुम्हाला जे करायचे ते करा, पण...... मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला 'हे' मोठे आवाहन

SCROLL FOR NEXT