Monsoon Assembly Session Esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Assembly Session: 'त्यांची-आमची जुनी ओळख!' पहिल्याच दिवशी जयंत पाटलांचा अजित पवारांना मिश्किल चिमटा

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवार यांच्या आणि इतर 8 नेत्यांनी शिवसेना-भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दरम्यान १७ जुलै म्हणजेच आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आधीपासून वर्तवली जात होती. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे.(Latest Marathi News)

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या सभागृहाचं कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उभं राहून नव्या मंत्र्यांची माहिती सभागृहाला द्यायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय द्यायला सुरुवात केली. (Marathi Tajya Batmya)

एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचा परिचय करून देताना उपमुख्यमंत्री व वित्त म्हंटलं आणि त्यांनी पलीकडच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांकडे पाहिलं. त्यानंतर बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'नाव सांगा', असं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं नाव घेतलं.(Latest Marathi News)

शिंदेंनी परिचय करून देताच अजित पवारांनी उभं राहात सगळ्यांना नमस्कार करून अभिवादन केलं. अजित पवार बसत असतानाच समोर विरोधी बाकांवर बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मिश्किलपणे 'त्यांची-आमची जुनी ओळख आहे' म्हणत कमेंट केली आहे. जयंत पाटील यांच्या बोलण्याने सभागृहात हशा पिकला. इतर नेत्यांसह अजित पवारांच्याही चेहऱ्यावरही हसू उमटले! (Marathi Tajya Batmya)

अजित पवारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटातील इतर मंत्र्यांचाही परिचय सभागृहाला करून दिला. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल पाटील या नव्या मंत्र्यांची नावे आणि खाती मुख्यमंत्र्यांनी सांगितली.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Barve: 'जातवैधता' बाबत रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा, पडताळणी समितीला दंड! राज्य सरकारवर न्यायालयाचे ताशेरे

Latest Maharashtra News Updates : नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस; वर्ध्यासह पश्चिम विदर्भात 'यलो अलर्ट'

शस्त्र परवाना देण्यावर पोलिसांचे निर्बंध! सोलापूर जिल्ह्यातील 4594 जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाने; अकलूजमध्ये सर्वाधिक, कोणत्या तालुक्यात किती जणांकडे बंदुका, वाचा...

गुणवत्तेअभावी घटतोय झेडपी शाळांचा पट! शाळांच्या भेटीसाठी नाहीत केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी; 136 केंद्रप्रमुख, 10 गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त, विषय शिक्षकही कमी

Ajit Pawar : 'त्या' आमदाराचं राष्ट्रवादीनं केलं निलंबन; जाणून घ्या काय आहे प्रकरण..

SCROLL FOR NEXT