Pune Station| Sangali Railway Station Bomb Threat Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Sangali Railway Station Blast Threat: आरोपीने पुण्यासह सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूरची रेल्वे स्थानके बॉम्ब स्फोट करून उडवून देणार असल्याची धमकी दिली होती.

आशुतोष मसगौंडे

पुण्यासह सांगली, मिरज, सोलापूर आणि कोल्हापूरची रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन सांगली पोलिसांना काही दिवसांपूर्वी आला होता. त्यामुळे या स्थानकांवर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत आरोपीच्या मुसक्या आवळण्याच यश मिळवले आहे.

संबंधित रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा सचिन मारुती शिंदे नावाचा आरोपी सातारा जिल्ह्यातील असून, फलटन तालुक्यातील तरडगावचा तो रहिवासी आहे. दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली शहर पोलिसांनी मुंबी लोहमार्ग पोलिसांची मदत घेत आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून अटक केले.

या आरोपीने 13 मे रोजी सांगली पोलिसांना धमकीचा फोन केला होता. त्यावेळी आरोपीने पुण्यासह सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूरची रेल्वे स्थानके बॉम्ब स्फोट करून उडवून देणार असल्याची धमकी दिली होती.

सुरुवातील हा धमकीचा फोन मॉकड्रिल असल्याचा समज पोलिसांना झाला होता. मात्र, नंतर असे पुढे आले की, धमकीचा फोन खरोखरच आलेला होता. त्यानंतर सांगली पोलिसांनी पूर्ण क्षमतेने तपासाला सुरूवात केली आणि आरोपी मुंबई सीएसएमटीमध्ये असल्याचा तपास लावला. सांगली पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांना संपर्क साधत आरोपीला अटक केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT