आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण sakal
महाराष्ट्र बातम्या

कांद्याचे दर घसरले! कांद्याच्या सरासरी भावात 10 दिवसांत 1,000 रुपयांची घसरण; 52,465 क्विंटलमधील 52,433 क्विंटल कांद्याला सरासरी बावीसशे रुपयांपर्यंत दर

गतवर्षी निर्यातबंदी आणि आता भावात घरसण, यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडत आहे. नोव्हेंबरच्या सुरवातीला प्रतिक्विंटल सरासरी भाव ३१०० रुपयांपर्यंत होता. पण, बुधवारी कांद्याला प्रतिक्विंटल २२०० रुपयांचा सरासरी भाव मिळाला.

तात्या लांडगे

सोलापूर : गतवर्षी निर्यातबंदी आणि आता भावात घरसण, यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडत आहे. नोव्हेंबरच्या सुरवातीला प्रतिक्विंटल सरासरी भाव ३१०० रुपयांपर्यंत होता. पण, बुधवारी (ता. १३) कांद्याला प्रतिक्विंटल २२०० रुपयांचा सरासरी भाव मिळाला. बुधवारी सोलापूर बाजार समितीत ५२४ गाड्या कांद्याची आवक झाली होती.

यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीपासूनच सतत पाऊस झाला. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पाऊस चांगला होईल आणि त्यातून सुरवातीला लावलेला कांदा विकून चांगला पैसा मिळेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी जुलै-ऑगस्टमध्येच कांदा लागवड केली होती. सततच्या पावसामुळे कांद्यात पाणी साचून राहिले आणि त्यातच कांदा खराब झाला. असाच खराब कांदा बाजार समितीत विकायला आणला, पण त्यासाठी एक रुपये प्रतिकिलो एवढा दर देखील मिळाला नाही.

आता काढायला आलेला कांदा अवकाळी झाल्यास खराब होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अनेकजण कांदा काढून लगेचच चिरून विकायला घेऊन येत आहेत. मात्र, त्यांना समाधानकारक भाव मिळत नसल्याची वस्तुस्थिती सोलापूर बाजार समितीत पाहायला मिळत आहे. सरासरी भाव प्रतिक्विंटल २२०० रुपयांपर्यंत असून अवघ्या सात क्विंटल कांद्याला सात हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. बुधवारी ५२ हजार ४६५ क्विंटल कांद्यातील ५२ हजार ४३३ क्विंटल कांद्याला सरासरी बावीसशे रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

बुधवारची कांद्याची स्थिती

  • एकूण गाड्या

  • ५२४

  • एकूण पिशव्या

  • १,०४,९३०

  • सरासरी भाव

  • २,२००

  • सरासरी भावाने विकलेला

  • ५२,४३३ क्विंटल

डिसेंबरमध्ये भाव वाढण्याची आशा

आता पावसाळा संपला असून शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या शेवटी लावलेला कांदा नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरमध्ये बाजारात येईल. सध्या बाजारात येणारा कांदा पावसामुळे खराब झालेलाच अधिक आहे. त्यामुळे भावात चढ-उतार होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण, नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरमध्ये चांगला कांदा बाजारात यायला सुरवात झाली की भाव सरासरी ३००० रुपयांवर राहील, असा विश्वास बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT