Rohit Pawar on eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

Onion Prices: "आधी अजितदादांकडून माहिती घ्यायला हवी होती..."; रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

Sandip Kapde

Onion Prices: महाराष्ट्रात कांद्यावरुन गदारोळ सुरु झाला आहे. कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्याचवेळी कांद्यावरील निर्यात शुल्क आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला. कांद्याचे भाव गगनाला भिडण्यापासून रोखण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांचा वाढता विरोध बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने या प्रश्नावर हस्तक्षेप करत, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून २०१० रुपये हा भाव देऊन दोन लाख मेट्रीक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. केवळ राजकारण न करता आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, असे देखील शिंदे म्हणाले.

यावेळी शिंदे यांनी शरद पवार यांना देखील उत्तर दिले आहे. "शरद पवार १० वर्ष कृषीमंत्री होते. त्यांच्या काळात देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तेव्हा कांद्याला भाव देण्याचा निर्णय त्या संकटकाळात घेण्यात आला नाही. पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा ते उभे राहिले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याचं राजकारण करण्यात येऊ नये," असे शिंदे म्हणाले.

rohit pawar tweet

यावर आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे.  "एकनाथ शिंदे साहेब पवार साहेब कृषीमंत्री असताना असा निर्णय झाला नाही, असं आपण म्हणालात, पण अजितदादांसोबत पत्रकार परिषदेत आपण हे वक्तव्य करण्याआधी पवार साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले होते, याची माहिती अजितदादांकडून घ्यायला हवी होती. ती घेतली असती तर कदाचित आपण हे वक्तव्य केलंच नसतं," असे रोहित पवार म्हणाले.

शरद पवार यांनी असा निर्णय घेतला नाही, हे आपलं म्हणणं नक्कीच खरं आहे. कारण पवार शरद पवार यांनी आजच्या भाजपा सरकार प्रमाणे निर्यातशुल्क आकारून कांद्याचे भाव पाडले नाहीत. प्रसंगी साहेब तत्कालीन वाणिज्य मंत्र्यांशी भांडले आणि शेतकरी हिताचेच निर्णय घेतले. त्यामुळं शिंदे साहेब आपण उगाचंच राजकीय पतंगबाजी न केलेचीच बरी, असे रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT