कांदा दरात घसरण sakal
महाराष्ट्र बातम्या

कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत! ओल्या कांद्याच्या भावात ६०० रुपयांची घसरण; प्रतिक्विंटल २६०० रुपयांचा सरासरी भाव; अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

पावसाने खराब झालेला कांदा, अवकाळी पावसाचा अंदाज आणि निर्यातबंदीची धास्ती, या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली आहे. शनिवारी सोलापूर बाजार समितीत ४७९ गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता. त्यावेळी सरासरी भाव ३२०० रुपयांवरुन थेट २६०० रुपयांवर आला होता.

तात्या लांडगे

सोलापूर : पावसाने खराब झालेला कांदा, अवकाळी पावसाचा अंदाज आणि निर्यातबंदीची धास्ती, या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली आहे. शनिवारी सोलापूर बाजार समितीत ४७९ गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता. त्यावेळी सरासरी भाव ३२०० रुपयांवरुन थेट २६०० रुपयांवर आला होता. बाजारात सध्या ओला कांदा विकायला येत असून त्यात पावसाने खराब झालेला कांदा देखील जास्त आहे.

गतवर्षी निर्यातबंदीचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने यंदा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा निर्यातबंदी होईल की काय, अशी धास्ती त्यांना आहे. मागील दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा कांयद्याला चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी पावसाळ्याच्या सुरवातीला कांदा लावला. पण, सततच्या पावसामुळे तसाच्या तसा कांदा जागेवरच खराब झाला. ज्या एकरात १५० ते २०० पिशव्या निघतील असा अंदाज असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती अवघ्या २० ते २५ पिशव्याच लागल्या.

मागील १५ दिवसांत बाजारात समितीत जेवढा कांदा विक्रीसाठी आला, त्यातील ३० टक्के कांदा हा पावसाने खराब झालेलाच होता, असे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या कांद्याला प्रतिकिलो ५० पैसे दर मिळाला. आता बाजार समितीत ओला कांदा विक्रीसाठी वाढत असून त्यामागे अवकाळी पावसाची भीती व निर्यातबंदीची धास्ती असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच कांद्याचा सरासरी दर कमी झाला असून सध्या ओल्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी २६०० रुपयांचा दर आहे. सुकलेल्या जुन्या कांद्याला चार हजार २०० ते ५२०० रुपयांपर्यंत आहे.

लिलाव सकाळी १० वाजल्यापासून

सोलापूर बाजार समितीत कांदा घेवून येणाऱ्या वाहनांना दुपारी चारनंतर दोन नंबरच्या गेटमधून आत सोडले जाते. पण, रात्री १२ नंतर त्या वाहनांना कांदा बाजारात प्रवेश दिला जातो. सकाळी १० वाजल्यापासून कांद्याचे लिलाव सुरु होतात. लिलावानंतर शेतकऱ्यांना १५ हजारांपर्यंत रोखीने दिले जातात व उर्वरित रकमेचा धनादेश दिला जातो. त्यावर १५ ते २० दिवसांची मुदत टाकली जाते अशी वस्तुस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT