Microsoft Update Issue sakal
महाराष्ट्र बातम्या

Microsoft Update Issue : आयटी कंपन्यांत ऑनलाइन ‘लॉकडाउन’;हिंजवडी, तळवडे पार्कमधील कामे खोळंबली

मायक्रोसॉफ्टच्‍या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड आल्‍याने शुक्रवारी (ता. १९) हिंजवडी, तळवडेसह परिसरातील ‘आयटी’ कंपन्‍यांची कामे खोळंबली होती.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मायक्रोसॉफ्टच्‍या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड आल्‍याने शुक्रवारी (ता. १९) हिंजवडी, तळवडेसह परिसरातील ‘आयटी’ कंपन्‍यांची कामे खोळंबली होती. सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत लॅपटॉप आणि संगणक बंद पडले होते. लॉग इन होत नसल्‍याने कर्मचाऱ्यांना कामे करताना अडचणी येत होत्‍या. दुपारी चार वाजल्‍यानंतर मायक्रोसॉफ्टने पर्याय उपलब्ध करून दिल्‍यानंतर संथ गतीने कामाला सुरुवात झाल्‍याचे ‘आयटीयन्‍स’कडून सांगण्यात आले.

मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर शुक्रवारी अचानक डाऊन झाले. त्याचा फटका जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात बसला. बँक, विमानसेवा, आयटी कंपन्‍या आदी ठिकाणी सर्वच कामे ठप्प झाली. हिंजवडीतील आयटी कंपन्‍यांनाही त्‍याचा फटका बसला. अनेक कंपन्‍यांचे सकाळी नऊ वाजल्‍यापासून अचानक सर्व्हर डाऊन झाले. अचानक लॅपटॉप- संगणकावर निळी स्क्रीन आली. सर्व कामे बंद झाले. रिस्टार्ट केल्यानंतरही काम सुरू होत नव्हते. हिंजवडीमध्ये सुमारे १२५ आयटी कंपन्‍यांचा समावेश आहे. हिंजवडीसह, तळवडे, औंध, बाणेर, बालेवाडी, विश्रांतवाडीसह अन्य भागातील आयटी कंपन्‍यांनाही याचा फटका बसला. अनेक नामांकित कंपन्‍यांवर कर्मचाऱ्यांना अघोषित सुट्टी देण्याची वेळ आली.

‘एक दिवस आधीच वीकेंड सुरू’

कंपन्यांचे काम ठप्प झाल्याने आयटीयन्सला शुक्रवारी सुटी मिळाली. ‘वीकेंड एक दिवस आधीच सुरू’ अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. त्यासंदर्भात अनेक मिम्स सोशल मीडियावर फिरत होते.

लॅपटॉप आणि संगणकाची स्क्रीन निळी पडत आहे. त्‍यामुळे अनेक कंपन्‍यांचे काम बंद पडले. कंपन्‍यांमधील कर्मचाऱ्यांशी बोलल्‍यानंतर माहिती समोर आली.

— हरप्रीत सिंह सलूजा, अध्यक्ष, नैसेन्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट एनआयटीईएस

सकाळी नऊ वाजल्‍यापासून समस्‍या निर्माण झाली होती. दुपारी चारपर्यंत तांत्रिक अडचण सुरूच होती. चार वाजल्‍यानंतर मायक्रोसॉफ्टकडून पर्यायी सोय करून देण्यात आली. — एक आयटीयन

ऑटोमोबाईल क्षेत्रावर काही परिणाम झालेला नाही. कंपन्‍यांचे कामकाज बंद पडल्‍याच्‍या कोणत्‍याही तक्रारी आलेल्‍या नाहीत.

— संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना.

आमच्‍या कंपनीत दुसरे सॉफ्‍टवेअर वापरले जात असल्‍याने त्‍याचा कामकाजावर परिणाम झाला नाही.

— जितेंद्र निखळ, प्रशासन अधिकारी, फोरेशिया इंडिया प्रा. लि.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT