Opposition attacks Home Department sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबई : विरोधकांचा गृह विभागावर हल्लाबोल

फडणवीस, मुनगंटीवार यांचे आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘एकविसाव्या शतकात जमिनी आणि कमीने यांचे भाव वाढतील’, हे भाकित महाविकास आघाडी सरकारचा कारभार पाहताना खरे ठरत असल्याचे पटते, अशा शब्दांत आज विधानसभेत भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षाच्या वतीने आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर भाजप आमदारांनी गृहविभागाच्या कारभारावर अनेक गंभीर आरोप केले. (Land and commodity prices will rise in the 21st century)

या सरकारच्या दोन वर्षांच्या काळात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. हे बदल्यांचे रॅकेट संपवले नाही तर कायदा व सुव्यवस्था कोसळून पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. राज्यात महिला आणि मुलीवरील अत्याचार कमालीचे वाढले आहेत. दोन वर्षांत ५ लाखांहून अधिक गंभीर गुन्हे नोंदवले असून, देशभरात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला.(If the racket of transfer does not end, law and order will collapse)

कोरोना मृत्यू दडवले : फडणवीस

महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात माणसे किड्या-मुंग्यासारखी बळी पडल्याचा आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आकडेवारी सादर केली. एप्रिल २०२१ मध्ये राज्यात एकूण ४०,६७१ मृत्यू झाल्याची नोद आहे. तर मे २०२१ मधे तब्बल ८४,२६२ मृत्यूची नोंद झाली. मात्र सरकारने केवळ १४,२६८ मृत्यूची नोंद दाखविली. यासोबतच मे २०२० मधे ५२,५९६ मृत्यू होते. तर मे २०२१ मध्ये ते तब्बल १,२२,०८४ इतके नोंदवले. पण सरकारने केवळ २६,००० दाखवले. तसेच जून २०२० मधे ६८,१७० मृत्यू होते. ते जून २०२१ मधे ८८,११२ इतके झाले. पण सरकारने केवळ २०१२ मृत्यूची नोंद कोरोनाने झाल्याची नोंद केल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

मंत्र्यांची चौकशी करा

दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबधित कासेगाव एज्युकेशन सोसायटीने खरेदी केलेल्या आणि परत सरकारकडून कोट्यवधीचा मावेजा मिळवल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी फडणवीस यांनी केली. त्यासोबतच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संबधित एका शिक्षण संस्थेच्या सहा महाविद्यालयांना एकाच वेळी मान्यता कशी मिळते, असा सवाल करत या प्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढल्याची माहिती विधानसभेत दिली. दरम्यान, राज्यात शिवभोजन थाळीमध्येही बोगस लाभार्थी दाखवून कोट्यवधीची लुट झाली. दुसरीकडे तब्बल ६.१६ लाख आदिवासी बालकांचे कुपोषण झाले आहे, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT