महाराष्ट्र बातम्या

चर्चेशिवाय एकही कायदा होऊ देणार नाही; विरोधीपक्षनेते अजित पवारांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर विश्वासदर्शक (Floor Test) ठरावही जिंकला आहे. त्यामुळे आता मविआकडून (Mahavikas Aghadi) विरोधी पक्ष (Opposition Leader) नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे येतून पुढील काळात अजित पवार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची जागा घेणार असून, येथून पुढे सभागृहात शिंदे सरकार विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अजित पवारांचं सर्वपक्षीय नेत्यांनी अभिनंदन केलं. या अभिनंदन ठरावाला अजित पवार यांनी उत्तर दिलं. (opposition leader Ajit Pawar Speech in Vidhansabha)

मी लोकसभेला देशात नंबर दोनच्या मतांनी निवडून आलो होतो. पहिल्या क्रमांवर रामविलास पासवान निवडून आले होते. मी गॅलरीतून अनेकदा काम पहायचो. शरद पवारांमुळे लहानपणापासून राजकारण जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. इथे आल्यानंतर इतरांकडे पाहून मी शिकलो असं अजित पवारांनी सांगितलं.

माझ्या कार्यकाळात एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असा विश्वास मी राज्यातील जनतेला देतो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करतो. यापूर्वी अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात जनतेचे मुद्दे उपस्थित केले. तशीच चर्चा घडवण्याचं काम आपण करू असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्रात सध्या दुबार पेरणीचं संकट आलं आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा जनतेची असते. सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळाला नाही तर ते विरोधी पक्षाकडे जातात. आपण कायम न्याय मिळवून देण्यासाठी काम करू असं अजित पवार यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT