maharashtra-vidhansabha sakal
महाराष्ट्र बातम्या

‘ईव्हीएम’च्या स्ट्राँग रूमबाहेर आता ६० तास पोलिसांचा पहारा! उमेदवार प्रतिनिधींनाही थांबण्यास परवानगी; शनिवारी सकाळी आठपासून सुरु होणार मतमोजणी

शनिवारी (ता. २३) सकाळी आठपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यावेळी १४ टेबल म्हणजेच एकाचवेळी १४ फेऱ्या सुरू राहतील. त्या दिवशी दुपारी साडेचारपर्यंत निकाल हाती येतील.

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे (ईव्हीएम) आता त्या- त्या तालुक्यांतील गोदामांमध्ये ठेवण्यात आली आहेत. निवडणूक अधिकारी- कर्मचाऱ्यांसह सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त त्या गोदामासमोर किंवा ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी असणार आहे. आज (बुधवार) पासून २३ नोव्हेंबरला निकाल लागेपर्यंत हा बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील तीन हजार ७३८ केंद्रांवर बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतमोजणी होईपर्यंत जिल्ह्यातील सर्वच ईव्हीएम सीलबंद करून गोदामांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणाहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या व परवानगी दिलेल्या वाहनांमधून ईव्हीएम त्या गोदामांत जमा करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांकडील ईव्हीएम जमा करण्यासाठी त्या गोदामाच्या ठिकाणी १४ टेबल लावले होते. मंगळवारी (ता. १९) सकाळी ११ नंतर इलेक्शन ड्यूटीवर गेलेले कर्मचारी मतदानानंतर ईव्हीएम जमा करून घरी जाण्याच्या धावपळीत पाहायला मिळाले. जिल्ह्यात एकूण ६६ ते ६७ टक्क्यांपर्यंत मतदान झाले असून, मतदारराजाचा कौल कोणाला, याचे उत्तर आता २३ नोव्हेंबरला मिळणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.

स्ट्राँग रूमबाहेर उमेदवार प्रतिनिधींना थंडीतही करावा लागेल ६० तास मुक्काम

मतदान पार पडल्यानंतर प्रत्येक केंद्रावरील ईव्हीएम त्या- त्या गोदामात किंवा शाळेत (मतमोजणीचे ठिकाण) ठेवण्यात आल्या आहेत. त्या स्ट्राँग रूमबाहेर उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना थांबता येणार आहे. त्यांच्यासाठी तेथे सोय करण्यात आली आहे. सध्या कडाक्याची थंडी असताना देखील त्या उमेदवार प्रतिनिधींना तब्बल ६० तास (मतमोजणी सुरू होईपर्यंत) त्या ठिकाणी थांबावे लागणार आहे. त्या प्रतिनिधींना अंथरूण, पांघरूण व जेवण स्वत:च आणावे लागणार आहे.

स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील तीन हजार ७३८ केंद्रांवरील ईव्हीएम त्या- त्या तालुक्यांतील गोदामांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी (ता. २३) सकाळी आठपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यावेळी १४ टेबल म्हणजेच एकाचवेळी १४ फेऱ्या सुरू राहतील. त्या दिवशी दुपारी साडेचारपर्यंत निकाल हाती येतील. तत्पूर्वी, या सर्व स्ट्राँग रूमबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, त्यावर प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur School: कोल्हापुरात मनपा शाळेत पालकांचा गोंधळ; ‘यह मत कहो खुदा से’ प्रार्थनेवर घेतला आक्षेप

IND vs AUS: ते असतील हुशार, पण...! पॅट कमिन्सने दिले टीम इंडियाला ओपन चॅलेंज, वाचा काय म्हणाला

Assembly Election: बारामतीत घड्याळ की तुतारी? कोणते मुद्दे ठरणार वरचढ? कोण जिंकणार गड? वाचा सविस्तर...

Heavy Earrings Tips: वजनदार कानातले घालून कानात होणार नाही वेदना, फॉलो करा 'या' ट्रिक्स

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क सुरू

SCROLL FOR NEXT