निर्जला एकादशीनिमित्त पंढरीत लाखो भाविकांची गर्दी
Pandharpur Ekadashi:  sakal
महाराष्ट्र

Pandharpur Ekadashi: निर्जला एकादशीनिमित्त पंढरीत लाखो भाविकांची गर्दी

राजकुमार घाडगे

Pandharpur: निर्जला एकादशी निमित्त मंगळवारी (ता.१८) पंढरी नगरी मध्ये लाखो भाविक दाखल झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग चंद्रभागा नदीचे वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. दरम्यान मंगळवारी सकाळी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यावरील तीन नंबर पत्रा शेड पर्यंत गेली होती. तर श्रीच्या दर्शनासाठी आठ तास लागत होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाच्या कामामुळे १५ मार्चपासून बंद असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन सुरू होते. दोन जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पद दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर आलेल्या निर्जला एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे पददर्शन घेण्यासाठी राज्यभरातील लाखो भाविकांचे पंढरीत आगमन झाले होते.

आज पहाटेपासूनच विठू नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. निर्जला एकादशी दिवशी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केल्यानंतर भाविक दर्शन रांगेत उभे राहत होते. सुमारे अडीच महिन्यानंतर पदस्पर्श दर्शन खुले झाल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ भाविकांना लागली होती.

आज सकाळी श्रींच्या दर्शनाची रांग तीन नंबर पत्रा शेड पर्यंत गेली होती. दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले बाबुराव नानासो सांगळे (रा.पिठोरी शिरसगाव, ता.अंबड, जिल्हा:जालना) 'सकाळ' शी बोलताना म्हणाले, आम्ही सकाळी सात वाजता पत्रा शेडमध्ये मधील दर्शन रांगेत उभे होतो.

आठ तासानंतर दुपारी तीन वाजता आम्हाला श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. बऱ्याच कालावधीनंतर श्री विठ्ठलाचे पददर्शन झाल्याने अत्यंत आनंदित झालो आहोत. श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने आणि निर्जला एकादशी दिवशी भाविकांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाल्याने प्रासादिक वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मध्यंतरी श्री विठ्ठलाचे पद दर्शन बंद असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. त्याचा परिणाम प्रासादिक वस्तूंच्या विक्री व्यवसायावर देखील झाला होता. मात्र आता पद दर्शन सुरू झाल्याने पंढरीत भाविकांची अलोट गर्दी होत आहे त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

- सागर ताठे- देशमुख, ताठे अगरबत्ती, पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे उद्या पुण्यात आगमन; 'मनपा'कडून जय्यत तयारी, विश्रांतवाडीतही तयारी अंतिम टप्प्यात

IND vs SA: 'विराट शतक करणार अन् भारत वर्ल्ड कप जिंकणार', फायनलपूर्वी दिग्गजाची भविष्यवाणी

Ind vs Sa T20 WC Final Live Score : विराट कोहलीने दोन चौकारांनी केली सुरूवात; मात्र केशव महाराजने दिले दोन धक्के

पालखी सोहळ्यात ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यास बंदी; परवानगीशिवाय चित्रीकरण केल्यास होणार कारवाई; पोलिस आयुक्तांचा इशारा

Rohit Sharma : शिव्या देतो... प्लेअरची धरतो कॉलर तरी कॅप्टन रोहित सर्वांना हवा हवासा का वाटतो?

SCROLL FOR NEXT